गोंदिया येथील मुलाने साकोली येथील लॉज वर नेत अल्पवयीन मुलीला केले गर्भवती ?

  • पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी अटक 

गोंदिया, दि. 20 ऑगस्ट 2024 : गोंदिया जिल्ह्यातील आरोपीने भंडारा जिल्ह्यातील तालुका लाखनी येथील एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केल्याचा एक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती 19 आठवड्याची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. तर पीडित मुलीच्या माहितीवरून आरोपी विरुद्ध पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील 12 व्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे आपल्या काकाच्या वाढदिवसा करिता गेली होती.

तिथे तिची आरोपी विनोद सुरेश अगळे (वय 28) रा. गोरेगाव सोबत ओळख झाली. नंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. सकाळ डिजिटलच्या माहितीनुसार आरोपी हा अल्पवयीन मुलीला तिच्या शाळेत येऊन भेटत होता. एक दिवस त्याने तिला साकोली येथे फिरायला नेले. दोघेही एका लॉजमध्ये थांबले. तिथे अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवले नंतर तिला परत घरी सोडून दिले. आता दोन -तीन दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता. तिथे डॉक्टरांनी मुलगी 19 आठवड्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.

पीडिता अल्पवयीन असल्याने तिथल्या डॉक्टरांनी पोलिस स्टेशनमध्ये याची माहिती दिली. लाखनी पोलिसांनी घटनास्थळ हे साकोली असल्यामुळे साकोली पोलिस ठाण्यात तक्रार द्यावयास सांगितले. त्यानुसार मुलीच्या वडिलांनी येथे आरोपी विनोद सुरेश अगळे याच्या विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सहायक पोलिस अधीक्षक सुशांत सिंह व पोलिस निरीक्षक संजय गायकवाड घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

ही घटना साकोली येथील एका लॉज मध्ये घडली आहे, साकोली येथे बऱ्याच लॉज व गेस्ट हाऊस असून यामध्ये अशाच प्रकारचे गैरकृत्य केले जाते. मागील एक महिन्यात अल्पवयीन मुलींना गर्भवती करण्याचे दोन ते तीन गुन्हे दाखल झाले असून या गुन्ह्यात साकोलीतील काही लाॅजमध्ये या अल्पवयीन मुलीं आरोपी सोबत गेल्याचे त्यांच्या बयाणात नमूद आहे. तरी सुद्धा पोलिस विभागाकडून या लाॅज मालकांवर कुठलीच कारवाई केली जात नाही. हा चिंतेचा विषय असून स्थानिक नागरिकांनी असे बदनाम लाॅज कायमचे बंद करण्याची मागणी केली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें