महायुती सरकारच्या निषेधार्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले चिखल फेको आंदोलन

गोंदिया, दी. २१ जून : राज्यात महायुतीची सरकार असताना सुद्धा नागरिकांचे, शेतकर्याचे, शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरत असल्याने गोंदियात काँग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकार वर आरोप करीत  पुतळा तयार करून त्यावर चिखल फेकत निदर्शने केली आहेत.

शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळत नाही, नागरिकांना सोयी सुविधा मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही तर दुसरीकडे दिवसेन दिवस प्रत्येक क्षेत्राचा खाजगीकरण हे सरकार करत असून, ह्या सरकार च्या विरोधात संपूर्ण राज्यात कॉग्रेस कमेटीच्या वतीने आज २१ जून रोजी आंदोलन करण्यात आले आहे.

तर गोंदिया जिल्याचे पालक मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे देखील मागील ४ महिन्या पासून जिल्यात आले नाही तर त्यांनी गोंदिया जिल्याचे पालकत्त्व सोडले असून त्यांच्या विरोधात देखील आज कॉग्रेस पक्षाने विविध आरोप करीत पुतळा तयार करून त्याच्यावर चिखल फेक करीत काळी शाही लावून निदर्शने केली आहे.

या आंदोलनात संपूर्ण गोंदिया जिल्याच्या ८ तालुक्यातून शेकडो कॉग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले असून हा आंदोलन गोंदिया शहरातील प्रशासकीय इमारती समोर करण्यात आला असून आपल्या मागण्याचे निवेदन कॉग्रेस कार्यकर्त्यांनी उप विभागीय अधिकर्यांना दिले आहेत, दरम्यान दिलीप बनसोड काँग्रेस जिल्हा अध्यक्ष गोंदिया, अमर वऱ्हाडे काँग्रेस प्रदेश सचिव गोंदिया यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें