गोंदियात भाजपला मोठा झटका, माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

गोंदिया, दी. २१ जून २०२४ : विधानसभेवर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले व सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आज दी. २१ जून रोजी दिला आहे. “माझ्या समर्थकांकडून मला भाजप पासून दुर होण्याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे मी भाजप पासून दुर होत आहे.” असा राजीनामा पत्र रमेश कुथे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे. सदर पत्र सध्या सोसल मिडियावर वायराल झाला आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे १४ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रमेश कुथे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अखेर रमेश कुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते कॉँग्रेस पक्षाच्या वाटेवर अशल्याचे बोलले जात आहे, मात्र त्यांनी पक्षप्रवेशा संदर्भात अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही.

जो लोकांच्या जवळचा असेल त्याला तिकीट देऊ : नाना पटोले 

कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे १४ जून रोजी गोंदिया दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना म्हणाले की अन्य पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कॉँग्रेस मध्ये येणार आहेत असे ते म्हणाले, गोंदिया विधान सभा निवडणुकी करिता तिकीट कुणाला देणार असे विचारले असता तिकीट एकालाच देण्यात येईल असे ते म्हणाले, यावर पत्रकारांनी विचारले की तिकीट नवीन की जुन्या कार्यकरत्याला देणार असे विचारले असता जो लोकांच्या जवळचा असेल त्याला तिकीट देऊ असे नाना म्हणाले, पटोले यांच्या बोलण्या नुसार कॉँग्रेस पक्षात आजी माजी आमदारांचा येन वेळेवर पक्ष प्रवेश होऊ शकतो आणि पक्ष त्यांना तिकीट देणार असे चित्र दिसत आहे, माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने हे चित्र अधिकच स्पस्थ झाले आहे.

Leave a Comment

और पढ़ें