आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त, योग दिवस उत्साहात साजरा

गोंदिया, दी. २१ जून २०२४ : आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून गोंदियात देखील हजारो लोकांनी एकत्र येत योगाशन करीत योग दिवस साजरा केला आहे, संपूर्ण देशात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत असून 21 जून 2015 ला याची सुरवात करण्यात आली असून गोंदियात देखील नगर उत्सव योग समिती गोंदिया च्या वतीने गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम वर योग दिनाचे आयोजन केले असून जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या शह गोंदिया शहरातील हजारो महिला पुरुषांनी या निमित्ताने सहभाग घेत सामूहिक रित्या योगा केला.

तर या वेळी नगर उत्सव समितीच्या वतीने आलेल्या लोकांना वृक्षाचे वितरण करण्यात आले, जिल्हाधिकारी प्रजित नायर आणी नगर उत्सव योग समितीचे अध्यक्ष डॉ प्रशांत कटरे यांनी योगाचे फायदे नागरिकांना पटवून देत फक्त 21 जुन रोजी योगा न करता वर्ष भर योगा करावे तेव्हाच आपण निरोगी राहू शकतो असे सांगितले आहे.

21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्याचे कारणही अत्यंत महत्वाचे आहे.  कारण 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे, ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. यामुळेच या दिवसाची निवड ही आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून करण्यात आली. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत योगा करताना दिसतात. दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनाची खास थीम देखील ठेवली जाते. या वर्षी योगा दिनाची खास थीम ही महिलांवर आधारित ठेवण्यात आली होती तर दरवर्षी काहीतरी वेगळा संदेश देणारी थीम आंतरराष्ट्रीय योग दिनाची असते. यावेळी महिलांना केंद्रित ठेवून ही थीम ठेवण्यात आली हे, यावेळी प्रजित नायर जिल्हाधिकारी गोंदिया, डॉ प्रशांत कटरे नगर उत्सव योग समिती अध्यक्ष, राजीव ठाकरेले नागरिक सह दरम्यान अन्य उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें