जलजीवन मिशन यौजणेच्या विहिरीत पडून ५० वर्षीय वेक्तीचा मृत्यू

अर्जुनी मोरगाव, दी. २० जून : तालुक्यातील निमगाव येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत माधो सोविंद मेश्राम (५०) हा व्यक्ती पडल्याची घटना मंगळवारी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली होती. विहिरीत २५ फूट पाणी असल्याने माधो मेश्राम याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी विहिरीतील पूर्ण पाण्याचा उपसा करावा लागला. पाणी उपसा करण्यासाठी तब्बल २२ तास लागले. यानंतर बुधवारी ( दि. १९ ) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास माधो मेश्राम याचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला.

निमगाव येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत पूरक नळ योजनेचे काम सुरू आहे. गावाजवळील तलावात नळ योजनेच्या विहिरीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम दरम्यान मंगळवारी विहिरीत मोटार पडली होती. ती मोटार बाहेर काढण्यासाठी कंत्राटदाराने या कामात पारंगत असलेल्या बोंडगावदेवी येथील माधो मेश्राम याला बोलावले होते. माधो मेश्राम हा विहिरीत मोटार काढण्यासाठी उतरला असता तो विहिरीत बुडाला.

विहिरीत पाणी भरपूर असल्याने त्याचा शोध लागला नव्हता. त्यामुळे अग्निशमन विभाग आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतील २५ फूट पाण्याचा उपसा करण्यात आला. पाण्याचा उपसा करण्यास तब्बल २२ तास लागले. यानंतर बुधवारी दुपारी १२:३० वाजता माधो मेश्राम याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाला शव विच्छेदन करण्यासाठी अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविन्यात आला, शव विच्छेदनानंतर मृतदेह माधो मेश्राम यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम १७४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें