गोंदिया, दी. २० जून : सन २०१३ पासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या तसेच सालेकसा तालुक्यातील पोलिसांच्या चकमकीत सहभाग आणि शासनाकडून ७ लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल नक्षलवाद्याने गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम (२५) रा.पुसनार, जि.बिजापूर (छत्तीसगड) असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे. या माओवाद्याने जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या समक्ष नक्षल आत्मसमर्पण योजनेतंर्गत आत्मसमर्पण केले आहे.

Author: Maharashtra Kesari News
Post Views: 504