भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल.
भंडारा, दि. 08 जुन 2024 : प्रेम प्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
“सद् रक्षणाय खलनिग्रहणाय” हा ब्रीद वाक्य येताच नागरिकांची सुरक्षा करणारे म्हणुन चित्र डोळ्यासमोर येतो. पण हेच रक्षक जर भक्षक बनले तर नागरिकांची सुरक्षा कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती.
तिथे तिची ओळख एका तरूनासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गुपचूप लग्नही केले. काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला त्याच्यावर संशय आला त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली.
त्यावेळी त्याने तिला नकार दिला. खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र सुदैवाने ती बचावली. त्यानंतर तिने प्रियकराविरोधत तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागाचे, उप विभागीय पोलीस अधिकारी बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले.
तरुणीला पोलीस अधिकाऱ्याच्या उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली. त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली. अखेर तरुणीने याची माहिती सामजिक संघटना यांना दिली. व त्यांच्या सोबत पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर पोलिस अधिक्षक यांनी गून्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
मुलीच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात 354 अ 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात चौकशी सुरु झाली असून हा अहवाल गृह मंत्रालयाला पाठीला जाणार असल्याचे भंडारा येथील पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहण्यासारखे असेल मात्र ज्या प्रियकराच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेल्यामुळे हा सर्व प्रकार घडला त्याच्यावर काय कारवाई होणार हे पाहण्यासारखे असेल.