Gondia news | अर्जुनी मोर, दी. 27 मे : गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी यांची बाकी असलेली प्रोत्साहन पर रासी ॲप सुरू करून गोंदिया जिल्ह्यातील उर्वरित 8 हजार 810 शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी देण्यात यावी अशी मागणी आज 27 मे रोजी दिलेल्या निवेदणातून केली आहे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत प्रोत्साहन राशी पोहोचवणे हा हेतू बाळगून गोंदिया जिल्ह्यामध्ये कुणीही प्रोत्साहन राशीपासून नियमीत कर्ज भरणारा शेतकरी वंचित राहू नये यासाठी संघटनेच्या तर्फे प्रयत्न सुरू अशल्याची माहिती तालुका अध्यक्ष ललित बाळबुद्धे यांनी दिली आहे.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जिल्हा संघ गोंदिया, तालुका संघ अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत सहकार आयुक्त व निंबधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य सहकार कमिश्नर पुणे यांना आज भेटून शेतकऱ्यांच्या समश्या बाबद सविस्तर माहिती देत लेखी निवेदन देण्यात आले. दरम्यान संघटनेचे जिल्हाध्यक्ष डोमा बोपचे, तालुका अध्यक्ष ललित बाळबुद्धे, संस्था अध्यक्ष प्यारेलाल गौतम तसेच अँड पोमेश रामटेके सहकार मित्र, कायदे विषयक सल्लागार उपस्थित होते. धान उत्पादक जिल्हे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चारही जिल्हातील शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी बाकी असल्याबाबत चर्चा करण्यात आली, तर मागण्या पूर्ण होतील असे आस्वाशन देण्यात आले.