एन्ट्री करणाऱ्या वाळू माफियांना सूट तर विना एन्ट्रीच्या वाहनावर कारवाई तालुक्यातील सत्य परिस्थिती!
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 06 मे 2024 : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून डम्पिंग केली जात आहे. तर डम्पिंग केलेली वाळू विक्री करीता मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे तहसीलदार अक्षय पोयाम यांचे हेतू परस्पर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यामध्ये रात्रगस्त घालणारे पोलीस व महसूल विभागाचे टीम दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे.
2024 मध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील एकही रेती घाट सध्या स्थितीत लिलावात नाही. महसूल विभागाचे मायनिंग अधिकारी सचिन वाढवे यांनी सांगितले की सडक अर्जुनी तालुक्यातील 6 ते 7 रेती घाट लिलावासाठी आहेत. पर्यावरण मंजुरी न मिळाल्याने या रेती घाटांचे लिलावअध्याप झाले नाही. मात्र लवकरच या रेती घाटांचे लिलाव होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यात एकही रेती घाट लिलाव नसला तरी बंद रेती घाटातून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याचे चित्र आहे. बंद घाटातून रेतीचा उपसा करून नदीपात्रा बाहेर मोठ्या प्रमाणात रेतीची डम्पिंग केली जाते, हीच रेती जेसीबीच्या साह्याने ट्रक मध्ये भरून बाहेर विक्रीसाठी पाठवली जाते, तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सर्रास हे काम सुरू असले तरी तालुक्यातील महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. एकंदरीत महसूल विभागाच्या मुखसंतीने हा सर्व प्रकार सुरू असल्याचे नाकारता येणार नाही.
तालुक्यातील सौंदळ – फुटाळा परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीचे डम्पिंग करण्यात आली आहे. याच डम्पिंग वरून ट्रक भरले जातात तर हे ट्रक तालुक्याबाहेर विक्रीसाठी पाठवले जातात. सडक अर्जुनी तालुका हा डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येत असला तरी डुगीपार पोलिस स्टेशन चे अधिकारी मंगेश काळे हे देखील या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यांचे म्हणणे आहे की वाळूच्या स्टॉक वर कारवाई करण्याचे आम्हाला अधिकार नाही. मात्र वाहतुकीवर कारवाई का करण्यात येत नाही हा मोठा प्रश्न आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.
तालुक्यामध्ये सुरू असलेला गौण खनिजाचा काळाबाजार कधी थांबणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तालुक्यामध्ये अनेक मोठे रेती माफिया या कामांमध्ये आहेत. तसेच ते अनेक पक्षांमध्ये कार्यकर्ते सुद्धा आहेत. त्यामुळे च प्रशासन कारवाई करत नाही का ? असा सुद्धा सवाल जनसामान्य माणसांमध्ये उपस्थित होत आहे.
सौंदळ – फुटाळा परिसरात रेतीची डंपिंग गेल्या 3 महिने पासून सुरू आहे. येथील ढोरफोडी, पटाची दान, लोहिया नगर, तसेच फुटाळा गावामध्ये चार ठिकाणी रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पूर्व तहसीलदार निलेश काळे यांनी 50 ब्रास वाळूवर कारवाई केली होती. मात्र ती रेती तहसील कार्यालयात कधी पोहोचलीच नाही. त्या कालावधीमध्ये सडक अर्जुनी तालुक्यात 102 ब्रास रेती वर महसूल विभागाने महाराष्ट्र केसरी न्यूज च्या माहितीवरून कारवाई केली होती. त्यातील 22 ब्रास रेती ही चोरीला गेली होती तर 50 ब्रास रेती सोडून उर्वरित रेती ही तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आली होते. मात्र फुटाळा येथे जप्त करण्यात आलेली 50 ब्रास रेती ही कधी तहसील कार्यालयात जमा झालीच नाही.
तसेच ट्रेनिंग वर असलेले तहसीलदार गणेश खताळे यांच्या कालावधीमध्ये देखील सौंदड फुटाळा परिसरात 60 ते 65 ब्रास रेतीवर महाराष्ट्र केसरी न्यूज च्या माहितीवरून जप्तीची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यातील सुद्धा फक्त 30 ब्रास रेती तहसील कार्यालयात जमा झाली तर उर्वरित्रीती 65 ब्रास रेती तहसील मध्ये जाता जाता रस्त्यामध्ये गायब झाली.
तर पळसगाव शेत शिवाराच्या परिसरामध्ये 25 एप्रिल रोजी 75 ब्रास रेती महाराष्ट्र केसरी न्यूज च्या माहितीवरून जप्त करण्यात आली होती. मात्र त्यातील फक्त 12 ब्रास रेती ही तहसील कार्यालयात जमा झाली. उर्वरित रेती तहसील कार्यालयात जाता जाता रस्त्यामध्ये कुठे गायब झाली असा सडक अर्जुनी तालुक्यातील महसूल विभागाचा बुरसटलेला कारभार आहे. अधिकाऱ्यांना ज्यांच्याकडून एन्ट्री प्राप्त होते अशावर तालुका प्रशासन कारवाई करत नाही तर ज्यांची एन्ट्री झाली नाही अशा वाहनावर महसूल विभाग कारवाई करते असे एका वाहनधारकाने नाव न समोर करण्याच्या शर्यतीवरून आम्हाला सांगितले, तालुक्यामध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभारावर आता तरी प्रशासन कारवाई करणार का याकडे महाराष्ट्र केसरी न्यूजचे लक्ष लागले आहे.