वाहणाच्या धडकेत तीन जण जागीच ठार एक जख्मी आनंदाच्या दिनी काळाचा घाला 

  • पिकअप वाहणाच्या धडकेत दुचाकी वाहणाचा अपघात 

गोंदिया, दि. 26 जानेवारी : जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव ते कोहमारा मार्गांवरील ग्राम नवेगावबांध बाराभाटी मार्गावर आज दुपारी मोठी दुर्घटना घडली असून यात दोन लहान बाळासह महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे, या घटनेने संपूर्ण परिसर हादरले असून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध रोड वर ही घटना घडली असून एका चार चाकी वाहणाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर सवार चार पैकी तीन जण ठार झाले असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. आज 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात 76 वा प्रजासत्तक दिन साजरा केला गेला अश्यात आनंदाच्या क्षणी या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसडले आहे.

तालुक्यातील येरंडी देवलगांव येथील रहिवाशी संदिप राजु पंधरे वय 29 वर्षे हा युवक आपल्या दुचाकी वाहन पल्सर क्रं. एम. एच. 35 ए. एम. 2756 ने पत्नी चितेश्वरी संदिप पंधरे वय 25 वर्षे व मुलगा संचित संदिप पंधरे वय 5 महिणे सह घरा जवळील पार्थवी रोहीत सिडाम वय वर्षे 3 हे दुचाकी वाहनाने आपल्या गावा वरून नवेगावबांध येथे जात असता बाराभाटी, नवेगावबांध मार्गावरील भारती बारच्या जवळपास मागून भरधाव वेगाने येणा-या चारचाकी वाहणाने जोरदार धडक दिली.

या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून वाहन बोलोरो पिकअप क्रं. एम.एच. 35 ए.जे. 4482 असे आहे. दुचाकी चालक संदिप राजु पंधरे वय 29 हा जबर जखमी झाला असून घटनेची माहीती मिळताच नवेगावबांध पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले ही घटना दुपारी 4 वाजता दरम्यान धडली, असुन मृतकांना नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात हलवन्यात आले अशी माहिती आहे, जखमी संदिप पंधरे यांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीला हलविण्यात आल्याची माहीती आहे. अपघातातील वाहन नवेगावबांध येथील असून स्थानिक पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. 

 

Leave a Comment

और पढ़ें