सौन्दड येथे ग्राम सभा शांततेत संपन्न, विविध मुद्द्यांवर चर्चा : सरपंच मोदी

सौन्दड, दि. 26 जानेवारी : सौंदड़ ग्राम पंचायत कार्यालय येथे सरपंच हर्ष मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज 26 रोजी ग्राम सभा अत्यंत शांततेने व यशस्वीपणे पार पडली. या सभेमध्ये गावाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, सभेमध्ये जलसंधारण, स्वच्छता, ग्राम पंचायतीच्या अर्थसंकल्पावर चर्चा, महिलांचे सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार निर्मिती, तसेच शाळा आणि रस्त्यांचे सुधारणा या सारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले.

ग्रामस्थांनी सभेला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली व आपल्या समस्या, सूचना आणि अभिप्राय मांडले, या सर्व मुद्द्यांवर ग्रामपंचायतीने गांभीर्याने विचार केला व उपाययोजना ठरवल्या, ग्राम सभेच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित ग्रामस्थांचे, पंचायतच्या सदस्यांचे व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. सभेच्या यशस्वी आयोजनामुळे गावाच्या प्रगतीचा मार्ग अधिक उज्ज्वल झाला, असल्याची माहिती सरपंच हर्ष मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें