गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दी. २७ जानेवारी : बिबट्याने हल्ला केल्याची माहिती खोटी असून शेतकऱ्याला कुठलीही जखम झाली नाही, अशी माहिती अर्जुनी मोरगाव वन परिक्षेत्राचे अधिकारी राजेंद्र बहुरे यांनी महाराष्ट्र केसरी न्यूज सोबत बोलताना सांगितले, आज दी. २७ जानेवारी रोजी सकाळी ७ : ३० वाजता दरम्यान ग्राम ईटखेडा येथील शेतकरी भास्कर राजगड हे आपल्या शेताकडे सायकल ने जात असताना त्यांच्यावर बिबट वन्य प्राण्याने हल्ला केले अशी माहिती आणि विडियो सोसल मिडियावर वायराल झाले, त्या विडियो मध्ये एक प्राणी दिसत आहे, तर सायकल रस्त्यावर पडली अवस्थेत दिसत आहे, त्याच बरोबर गावातील नागरिकांचा जमाव ही दिसत आहेत, त्या मुळे बिबट वन्य प्राण्याने शेतकर्याची शिकार केली असून वन विभाग व पोलिस विभाग वन्य प्राण्याला पकडत आहेत, अशी माहिती सोसल मिडियावर पसरली, मात्र असे काहीही झाले नसून सदर शेतकरी हा सायकल ने जात असताना रस्त्यात पडला, काही वेळाने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सदर शेतकरी सुखरूप आहे, त्याला वन्य प्राण्या पासून कुठलीही जखम झाली नाही, त्या मुळे चुकीची माहिती पसरली अशी माहिती वन विभागाने दिली आहे, सदर परिसरात बिबट पाहून शेतकरी घाबरून सायकल वरुण पडला असावा असा अंदाज वेक्त केला जात आहे.
- तो जखमी बिबट झाला जेरबंद
वन विभाग गोदिया अंतर्गत अर्जुनी मोर. वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र वडेगांवच्या नियतक्षेत्र ईटखेडा येथील श्मशान घाट परीसरात वन्यप्राणी बिबट जख्मी अवस्थेत असल्याची माहिती प्राप्त होताच अर्जुनी मोर. चे वनपरीक्षेत्र अधिकारी आर. एम. बहुरे हे आपल्या चमुसह मौकास्थळी दाखल झाले, सदर घटनेची माहिती उपवनसंरक्षक वनविभाग गोंदिया प्रमोदकुमार पंचभाई, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी नवेगांवबांध ए. बी. मेश्राम, सहाय्यक वनसंरक्षक ( रोहयो व वन्यजिव ) गोंदिया सचिन डोंगरवार यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शना नुसार आर.आर.टी. चमु नवेगांवबांध व डॉ. समीर शेंद्रे अर्जुनी मोर. ( एन.एन.टि.आर. ) पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेघराज यांना पाचारण करण्यात आले.
यावेळी संपुर्ण चमु मौकास्थळी हजर झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शना नुसार सदर वन्यप्राणी बिबट ला बेशुद्ध करुन पकडण्यात आले. सदर बिबट हे मादी बिबट असुन त्याचे अंदाजे वय ३ वर्ष असल्याचे समजले, त्याचबरोबर मादी बिबट चे मोजमाप घेवुन पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर सदर मादी बिबट्यास शुद्धीवर आणले, त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार सदर मादी बिबटयास पुढील उपचाराकरीता टी.टी.सी. नागपुर येथील शासकीय वाहन क्र. एम. एच. ३५ के ४८१५ ने आरआरटी चमुसह पाठविण्यात आले, सदर कारवाही वेळी कुणालाही इजा झाली नाही अशी माहिती वन विभागाने दिली आहे.
