सडक अर्जुनी, दि. 27 जानेवारी : प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालय एरिया 51 कोहमारा ता. सडक अर्जुनी येथे ध्वजारोहण करण्यात आले. महामानव, भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे, जो प्रत्येक नागरिकाला मुक्तपणे जगण्याचा, विचार करण्याचा, बोलण्याचा, शिकण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार देतो तसेच सर्वांच्या हक्कांचे रक्षण करतो असे भारतीय संविधानाचे प्रस्तावना वाचन करून, तेजराम चुटे (सेवानिवृत्त व्यवस्थापक भंडारा अर्बन बँक ) यांच्या अध्यक्षतेखाली व जयप्रकाश फुले ( सेवानिवृत्त आरोग्य विभाग) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच उपस्थित नागरिकांनी संविधान रक्षणाचा संदेश दिला आणि लोकशाही सुदृढ करण्याचा संकल्प केला. नागरिकांनी ध्वजारोहणाद्वारे संविधान आणि लोकशाहीवरील आपली निष्ठा आणि अभिमान व्यक्त केला. याप्रसंगी मुन्ना देशपांडे, गोवर्धन खोब्रागडे, शेखर चांदेवार, परमानंद कोवे, ज्ञानेश्वर चौरावार, वंदनाताई थोटे (माजी सरपंच कोहमारा) करुणाताई गेडाम, वंदनाताई डोये, किरणताई सोनवाणे, सुजाताताई मसराम, दिनेश मसराम, देवा कावळे, शालिक जनबंधु, दिलीप काटेंगे, सचिन रामटेके, मधुकर नंदागवळी, विशाल राऊत, धिरज गावतुरे प्रामुख्याने उपस्थित होते.
