सौंदड येथे मुख्य मार्गावर बस थांबत असल्याने प्रवाशांना होतो कमालीचा त्रास


खासदार सुनील मेंढे यांनी दिले होते आश्वासन पंधरा दिवसात होणार बस स्थानक दोन वर्ष लोटले तरी बस स्थानकाची निर्मिती नाही.


सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दिनांक : 05 मे 2024 : गोंदिया जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 हे सडक अर्जुनी तालुक्यातून जाते हे रायपुर ते नागपूर मार्ग आहे तर तालुक्यातील ग्राम सौंदड येथून गोंदिया ते चंद्रपूर कडे जाणारे रेल्वे मार्ग सुद्धा आहे. या या ठिकाणाहून रेल्वे मार्ग जात असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर उड्डाणपुलाचे निर्माण करण्यात आले आहे. मात्र तब्बल सहा वर्षापासून या उड्डाण पुलाचे अपूर्ण काम असल्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच उड्डाण पुलाच्या बाजूने जाणाऱ्या सर्विस रोडची देखील दैनिय अवस्था झाल्याने जीव घेणे खड्डे निर्माण झाले आहेत.

उड्डाणपुलाचे काम गेले सहा वर्षे पासून सुरू असल्याने या ठिकाणी बस थांब्याची निर्मिती करण्यात आली नाही. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी या गावांमध्ये नागरिकांचे अडचणींना लक्षात घेता पत्रकारांशी बोलताना आश्वासन दिले होते की पंधरा दिवसांमध्ये या ठिकाणी बस स्थानकाची निर्मिती होणार मात्र आश्वासन देऊन दोन वर्ष लोटले असले तरी या ठिकाणी बस स्थानक अद्याप तरी तयार झाले नाही.

विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 53 वर गावातील मुख्य मार्ग येते याच मुख्य मार्गावर दररोज येणाऱ्या बस थांबतात, त्यामुळे गावातून मुख्य मार्गावर येणाऱ्या प्रवाशांना तसेच रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवासांना मुख्य मार्गावर थांबलेल्या बस मुळे थांबावे लागते, जोपर्यंत बस जात नाही तोपर्यंत वाट पहावी लागते. या रोजच्या प्रकारामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घेऊन बस स्थानकाची सोय तत्काळ करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

गावातील विरोधी पक्ष जाती पातीच्या राजकारणा पुरते

गावामध्ये जातीपातीचे राजकारण व्हाट्सअप आणि फेसबुक वर केले जात आहे. मात्र तब्बल सहा वर्षापासून गावामध्ये निर्माण झालेल्या समस्या कडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. गावात भाजपा आणि काँग्रेस पक्ष मिळून दोन गट आहेत. परंतु गावातील नागरिकांच्या समस्याकडे पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही असं दबक्या आवाजात बोललं जात आहे. भाजपा पक्षाचे गावामध्ये सरपंच आहेत त्यांनी जनतेच्या समस्यांना लक्षात घेता भीक मांगो आंदोलन करून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असली तरी या उड्डाण पुलाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही.

तर गावात काँग्रेस पक्षाचे दुसरे गट आहे. त्या गटाचे या गावांमध्ये पूर्व सरपंच असलेले आणि जनतेचा त्यांना बलाढ्य असा सात असला तरी त्यांनी जनतेच्या या समस्याकडे कधीही लक्ष दिले नाही. असे चित्र आहे. सौंदळ ग्रामपंचायत मध्ये विरोधात असलेले विरोधक फक्त स्वतःच्या स्वार्था करिता गावात राजकारण करून फेसबुक आणि व्हाट्सअप पुरतेच विरोध करीत असल्याचे चित्र जनतेसमोर आहे. त्यामुळे गावातील समस्या विरोधी पक्षात असलेले ग्रामपंचायत पदाधिकारी सोडवणार का ? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. सत्तेत असलेले पदाधिकारी जर काम करत नसतील आणि जनतेच्या समस्याचे निवारण करत नसतील तर त्यांना धारेवर धरण्याचे काम विरोधी पक्षात असलेल्या पदाधिकाऱ्यांचे असते मात्र गावात स्वतःपुरते राजकारण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावातील जनता या सर्व प्रकाराकडे कुठल्या नजरेने पाहते हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

तालुक्यातील सर्वात मोठे गाव सौंदळ आहे. या गावात मुख्य मार्गावर बस स्थानक नसल्यामुळे प्रवाशांना वाहनांची वाट पाहण्यासाठी उन्हाचे चटके सोसत पान टपरीच्या आडोश्याला उभे राहावे लागत आहे. परिसरातील नागरिक याच ठिकाणावरून नागपूर, रायपूर देवरी गोंदिया साकोली कडे जातात. विशेष म्हणजे गोंदिया किंवा चंद्रपूर वरून रेल्वे मार्गाने येणारे प्रवासी देखील याच ठिकाणावर थांबून मिळेल त्या वाहनाने पुढचा प्रवास करतात.


 

Leave a Comment

और पढ़ें