गोंदियाच्या एन एम डी कॉलेज मधून ६० विद्यार्थी शिक्षण घेऊन झाले पत्रकार


गोंदिया, दी. 05 मे 2024 : गोंदियाच्या एन एम डी कॉलेज मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठा अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या National Education Policy या उपक्रमा अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यास क्रमाच्या पहिल्या ब्याच मधून ६२ पत्रकार तयार झाले असून गोंदिया जिल्यातिल वतर्मान पत्राचे तसेच वृत्तवाहिन्यांचे जिल्हा प्रतिनिधी तसेच एन एम डी कॉलेज च्या मुख्याध्यापिका डॉ शरदा महाजन, प्रा.  बाबन मेश्राम यांच्या हस्ते आहेत.  या विद्यार्थ्यांना पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यास क्रमाचे सर्टिफिकेट आज 04 मे रोजी वितरण करण्यात आले आहेत.

या उपक्रमाची सुरवात वर्ष २०२३ मध्ये एन एम डी कॉलेज मध्ये करण्यात आली असून वर्ष २०२४ मध्ये ६० विद्यार्थ्यांची दुसऱ्या ब्याच पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. तर यावेळी गोंदिया जिल्यात विविध वर्तमान पत्रामध्ये, वृत्त वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पत्रकारिता सर्टिफिकेट मिळविलेल्या तरुण पत्रकारांना आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केले तर या पूर्वी गोंदिया जिल्यातील विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे शिक्षण घेण्यासाठी नागपूर पुणे, मुबई या सारख्या मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते.

मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने National Education Policy या उपक्रमा अंतर्गत विविध कोर्स सुरु केल्याने याचा फायदा गोंदिया जिल्यातील विद्यार्थ्यांना होऊ लागल्याने आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्यातिल मुले मुली पत्रकारितेचे शिक्षण घेऊ शकत असल्याने येथील विद्यार्थ्यांनी आनंद वक्त करीत पत्रकार होण्याचा स्वप्न बाडगले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें