एकोडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते उद्घाटन


गोंदिया, दी. २१ डिसेंबर : खा. प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नामुळे नुकत्याच राज्य शासनाने घोषित केलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20, 000 रुपये बोनस घोषित केला. श्री पटेल सदैव शेतकरी शेतमजूर बेरोजगार यांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असतात.  तिरोड्यातील अदानी प्रकल्पामुळे परिसरातील युवकांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष रोजगार मिळाला तसेच सीएसआर च्या माध्यमातून आजूबाजूच्या गावांचा विकासाला चालना मिळाली. धापेवाडा उपसा सिंचनामुळे शेतकरी वर्गाला सिंचनाचे, शेतमजुरांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहेत. हे सर्व श्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाचेच फलित आहेत. असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

यावेळी शेतकऱ्यांना बोनस उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार प्रफुल पटेल व शासनाचे शेतकऱ्यांनी आभार मानले.

ग्राम एकोडी तालुका गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते १९ डिसेंबर रोजी संपन्न झाले. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, एकूण येथील जनसंपर्क कार्यालय हे गोंदिया व तिरोडा तालुक्याच्या मध्यभागी असल्याने परिसरातील जनतेच्या समस्या व अडी – अडचणी सोडवण्यासाठी दुवा ठरेल.

सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, राजेश कटरे, अविनाश जयसवाल, राजेश तायवाडे, राजेश गुनेरिया, अश्विनीताई पटले, राजेश तुरकर, जगदीश (बालु ) बावनथडे, शंकर टेंभरे, हितेश फताये, डॉ.संदिप मेश्राम, डॉ. किशोर पारधी, रविकुमार पटले, द्वारका साठवने, मोनू पठान, गोविन्द लिचडे, रंजित टेंभरे, अनिल मडावि, रघुवीर उईके, आरिफ़ पठान, धर्मेन्द्र कनोजे, बंटि रिणायत, लंकेश पटले, प्रशांत मिश्रा, दिपक रिणायत, पुरुषोत्तम भदाडे, हमजा शेख, शुभम बोदेले, लोकेश नागभिरे, चानेश बिसेन, हिरा तुमडाम, बालु भदाडे, महेंद्र कनोजे, शांतून पारधी, शैलेश सहारे, देवलाल टेंभरे, प्रकाश बिरणवार, अबतार खान, नितेश खोब्रागडे, श्रावन बरियेकर, रोशन बोरकर, देवांद बरियेकर, सचिन पटले, सुरेंद्र ठाकरे, बाबा रोकडे, मधु चौधरी, रफिक शेख, श्रावन पटले, मोतीलाल उइके, राजु बरियेकर, प्रेम बरियेकर, गौरव पारधी, स्वपनिल पारधी, गोलू असाठी, विशाल कनोजे, विजय पेशने सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नरेशकुमार असाठी, व आभार डॉ. किशोर पारधी यांनी केले.


 

Leave a Comment

और पढ़ें