मोटार सायकल चोरी करणाऱ्या 2 आरोपीसह 8 मोटर सायकल जप्त.


गोंदिया, दी. 12 डिसेंबर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गस्तीदरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका वेक्ती कडे चोरीची मोटार सायकल आहे. अश्या प्राप्त माहिती वरुन सराईत गुन्हेगार नामे 1) आकाश कमलाकर पवार वय 27 वर्षे राहणार हनुमान गल्ली लक्ष्मी नगर गोंदिया यास ताब्यात घेण्यात आले. त्यास मोटार सायकल चोरी संबंधात विचारणा केली असता सुरवातीस उडवाउडविचे उत्तरे दिली. विश्वासात घेवून पुन्हा विचारपूस केली असता त्यांनी त्याचा साथीदार नामे.

अजय तेलंग रा. गौतमनगर गोंदिया याचेसोबत मिळून मो. सा. चोरी केल्याचे सांगितले. यावरून गुन्हेगार नामे – 2) अजय श्रीराम तेलंग वय 32 वर्षे राहणार गौतम नगर बाजपेयी वॉर्ड गोंदिया यास ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपी यांचे ताब्यातून त्यांनी गोंदिया, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अश्या विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या 8 मोटार सायकल एकूण किंमती 4,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले. सदर जप्त मोटार सायकल पैकी 1 मो. सा. ही पो. स्टे. गोंदिया शहर दाखल गुन्ह्यातील असल्याने दोन्ही आरोपी यांना जप्त मोटर सायकल मुद्देमालासह गोंदिया शहर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले.  अधिकचा तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें