- 15 दिवस लोटूनही उपोषण सुरूच प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष!
- उपोषण धारकाला अवैध उत्खनन करणाऱ्यांकडून जिवे मारण्याची धमकी.
- पुरावे असून सुद्धा बनावट अहवाल सादर ?
गोरेगाव, दी. 01 नोव्हेंबर 2023 : ग्रामपंचायत मोहाडी व महसूल विभाग गोरेगाव येथे झालेल्या विविध भ्रष्टाचाराला उघड करण्यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते लेकेश कावळे व त्यांची पत्नी दि. 16 नोव्हेंबर 2023 पासून बेमुदत आमरण उपोषणावर बसले आहेत. या उपोषणाला आज तब्बल 15 दिवस लोटले असून प्रशासनाने सदर उपोषणाची अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे कुठेतरी अधिकाऱ्यांचे इथे हात ओले झाले आहेत का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
लेकेस कावळे यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषद दरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले की दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजे दरम्यान तहसीलदार भदाणे, नायब तहसीलदार नागपुरे, पोलीस निरीक्षक भुसारी आपल्या ताफ्या सोबत उपोषण स्थळी आले. दरम्यान तहसीलदार यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात भरती होण्यास सांगितले. त्यावर कावळे यांनी सांगितले की सदर आदेशाला आम्ही नकार दिला.
वैद्यकीय उपचार घेण्यास मनाई केली व उपोषण स्थळावर कुठेही इतरत्र जाण्यास मनाई केली. त्यानंतर तहसीलदार यांनी पोलीस निरीक्षक यांना आदेश देऊन जबरदस्तीने आम्हाला उचलून ॲम्बुलन्स मध्ये घातले व गोरेगाव येथील दवाखान्यात भरती केले. गोरेगाव येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी करून पुढील तपासनीसाठी गोंदिया येथे रात्री 8 वाजे रेफर केले. गोंदिया येथे आमची पुन्हा तपासणी करून आम्हाला भरती होण्याबाबत सांगितले.
परंतु आम्ही दवाखान्यात भरती होण्यास नकार दिला व तसेच सही करून लिहून दिले. त्यानंतर आम्हाला रुग्णवाहिका द्वारे परत मोहाडी येथे उपोषण स्थळी सोडून दिले. रात्री साडेदहा वाजता पासून आम्ही आज दिनांक 30, नोव्हेंबर रोजी पर्यंत उपोषण स्थळी बसून आहोत.
विशेष म्हणजे आम्हाला कुठलीही लेखी स्वरुपात पूर्वसूचना न देता उपोषण स्थळावर असलेले पोलीस प्रोटेक्शन प्रशासनाने काढून घेतले. उपोषण ठिकाणी महिला देखील बसल्या आहेत.
प्रशासनाने जबर जस्ती करीत उपोषण धारकांना उचलण्याचा प्रयत्न केला. या मागे राजकीय वरद हस्त काम करीत असल्याचा आरोप कावळे यांनी केला आहे. एकंदरीत भ्रष्टचार करणाऱ्या लोकांना शासकीय यंत्रणेचा आशीर्वाद असल्याचे यावरून दिसून येते.
उपोषण स्थळी पत्रकार परिषद दरम्यान लकेश कावळे, लक्ष्मी कावळे, संजय बघेले, अविनाश मेश्राम व अन्य समर्थक उपस्थित होते.
उपोषण दरम्यान त्यांनी केलेल्या मागण्यांना पुढील प्रमाणे
1) ग्रामपंचायत मोहाडी येथे तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याचे बांधकाम तांडा वस्तीत न करता. फक्त एकाच व्यक्तीसाठी सिमेंट रस्त्याचे बांधकाम दुसरीकडे करण्यात आले आहे.
2) अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हे पात्र लाभार्थ्याला न देता उशिरा फॉर्म भरणाऱ्या महिलेला पत्र करून देण्यात आले. विशेष म्हणजे सदर महिला दुसरीकडे दोन ठिकाणी मानधन तत्वावर काम करीत आहे. गटांचे सी.आर.पी.सी. व योग शिक्षिका म्हणून.
3) ग्राम पंचायत सचिवालय समोर अंदाजे 400 ट्रिप मातीचा भरणा करण्यात आला आहे. ज्याचे महसूल विभागाकडून कुठलेही परवाना घेण्यात आला नाही. अवैध रित्या जेसीबी ने उत्खनन करून ट्रॅक्टर ने वाहतूक करण्यात आली. त्या मुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्यात आला आहे.
4) पोलीस पाटील पद भरती प्रक्रिया ही उपविभागीय अधिकारी तिरोडा व तहसीलदार गोरेगाव यांनी नियमबाह्य केले असून अपात्र उमेदवाराला पात्र दाखवून पात्र उमेदवाराला अपात्र केले आहे.
या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कावळे यांनी केली आहे. विशेष म्हणजे लेकेस कावळे यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्या मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र माहीतीचा अधिकार अर्ज लावल्या नंतर प्रशासनाने चौकशी करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे एकाच चौकशीचे बनावट दोन दोन अहवाल बनवण्यात आले आहे. त्या मुळे अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्याचा आरोप कावळे यांनी केला आहे.
ग्राम पंचायत कार्यालय समोर माती टाकणारा कॉन्ट्रॅक्टर कमलेश सेवकराम पटले यांनी आम्हाला मारण्याची धमकी दिली आहे. आम्हाला काही झाल्यास सदर वेक्ति जबाबदार राहील. या पूर्वी त्याने एका वेक्तिला चाकू मारले आहे. जो पर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. तो पर्यंत उपोषण सुरू राहील असे कावळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.