प्रतिनिधी/गोंदिया, दी. २८ नोव्हेंबर : संविधान दिनानिमित्त गोंदियातील संजय नगर येथील जय भीम चौकात 5 लाख रुपये खर्चून बुद्ध विहाराचे सुशोभीकरण व 15 लाख रुपये खर्चून कव्वाली मैदान रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. दरम्यान, जनता की पार्टी चाबी संघटनेचे शहराध्यक्ष कशिश जैस्वाल, युवा नेते रोहित अग्रवाल, मयूर मेश्राम उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त व आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्याला प्रेरित होऊन संजय नगर येथील नागरिकांनी मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली जनता की पार्टी चाबी संघटनेत प्रवेश करून जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली.
मयूर मेश्राम, शहराध्यक्ष कशिश जैस्वाल, युवा नेते रोहित अग्रवाल यांनी सर्वांचे जनता की पार्टी पक्षात दुपट्टा टाकून स्वागत केले व आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी संविधान दिनानिमित्त सर्वांनी संविधान रक्षणाची शपथ घेतली.
गेल्या 4 वर्षात गोंदिया शहरातील प्रत्येक भागात विकास : युवा नेते रोहित अग्रवाल
यावेळी जनतेशी संवाद साधताना युवा नेते रोहित अग्रवाल म्हणाले की, गोंदिया शहरात गेल्या 4 वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. गोंदिया शहरासाठी आणखी निधी मंजूर होणार आहे. गोंदिया शहराला उत्तरेकडून दक्षिणेला जोडणाऱ्या पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा पूल पूर्वीपेक्षा रुंद होणार आहे. यासोबतच गोंदिया शहरात प्रथमच 7 नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असून 1500 नागरी आवास योजने अंतर्गत घरांना मंजुरी देण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत व्हावी आणि शहर स्वच्छ राहावे यासाठी सुशोभीकरण, रस्ते बांधणी, नाल्यांचे बांधकाम यावर भर दिला जात आहे. कचऱ्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही युवा नेते रोहित अग्रवाल यांनी दिली.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये रोशन मेश्राम, पवन मेश्राम, प्रथम मेश्राम, मयूर मेश्राम, सुभाष भालाधरे, विश्वास भालाधरे, विक्की कोल्हटकर, अविनाश निकोसे, राजेश, राम भाऊ, साहिल मोरे, अखिलेश सावरकर, कुवरलाल शेंडे, परीक्षित उके, सोनू (अन्ना) मेश्राम, अभिलाष राहुलकर, शाहरुख़ ख़ान, संघर्ष मेश्राम, नीतेश चंद्रिकापूरे, वैशालीबाई दहाट, सरिताबाई मेश्राम, शालिनी बागड़े, अलका कोल्हटकर, शोभा खांडेकर, विद्या बनसोड, माधुरीबाई, पुष्पकला उके, चन्द्रभागा शेंडे, मायाबाई कुसराम, पद्मा भालाधरे, वंदना आसने, ममता यादव यांचा समावेश है.
