अर्जुनी मोर., दी. 25 नोव्हेंबर : पुर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपुर हे चार जिल्हे झाडीपट्टी रंगभूमी व कलेची सादरीकरण करणारे जिल्हे म्हणुन महाराष्टात प्रख्यात आहेत. आपल्या परिसरात भाऊबिजेच्या सणापासुन तर मकरसंक्रांती पर्यंत गावागावात मंडई आणी रात्रौ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
झाडीपट्टी ची लोककला, विविध सामाजिक नाटके, कव्वाली, तमाशा व खास करुन महाराष्ट्राची प्रसिध्द मराठी लावणी या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केल्या जाते हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसिक मायबापांची उपस्थिती विलक्षणीय असते. रसिक प्रेक्षकांमुळेच झाडीपट्टी चे अस्तित्व टिकून आहे. असे प्रतिपादन अर्जुनी मोर. नगरपंचायतचे नगरसेवक तथा गोंदिया राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष चे उपाअध्यक्ष दानेश साखरे यांनी केले आहे.
तालुक्यातील इंजोरी व अरततोंडी येथे आयोजित ता. 23 मराठी लावणी कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी दानेश साखरे बोलत होते. यावेळी जि.प. सदस्य लायकराम भेंडारकर, पं.स. सदस्य संदिप कापगते, काॅग्रेसचे केतन मेश्राम, राष्ट्रवादी चे शालीक हातझाडे, गोंदिया जि.प. चे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, तालुका काॅग्रेस चे कार्याध्यक्ष प्रमोद पाऊलझगडे, रविंद्र खोटेले, भोजराम रहिले, संजय ठवरे, दोन्ही गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व अन्य मान्यवर उपस्थित होते. दोन्ही गावातील कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.