खुन करून पळून जाणारे 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात.


गोंदिया, दी. 15 नोव्हेंबर : दुचाकी वाहनाला कट मारल्याच्या वादावरून तीन आरोपींनी एकाची हत्या केली होती. तर हत्या करणारे आरोपी घटना स्थावरून पसार झाले होते. गोंदिया पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

गोंदिया पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार तक्रारदार राहुल राजु डाहाट वय २४ वर्षे रा. दीनदयाल वार्ड रामनगर गोंदिया व त्याचा मीत्र अर्पित ऊर्फ बाबु ओमप्रकाश उके वय 24 वर्ष रा. आंबाटोली गोंदिया असे पालचौक ते गुरुद्वारा रोडने जात असताना चाय शाय बार दुकाना समोर रात्री 11:15 वा. दरम्यान 1) हर्ष छविंद्र वाघमारे रा. कुडवा गोंदिया 2) अंकज सोहनलाल राणे ऊर्फ राणा रा. डब्लींग कॉलनी जवळ गोंदिया 3) प्रविण सुनिल मुटकुरे रा. रेल्वे स्टेशन समोर, रेलटोली गोंदिया. यांच्या ताब्यातील मोटर सायकल वरुन गुरुद्वारा ते पालचौक या दिशेने येवुन फिर्यादी व अर्पित उके याला मोटार सायकल ने कट मारुन गेले.

या कारणावरुण त्यांच्यात वाद झाले. त्यामध्ये अर्पित याला 1) हर्ष 2) अंकज 3) प्रविण या तिघानी संगमत करुन अर्पित उके याला चाकूने वार करुन ठार मार केले तसेच फिर्यादीला फरशी च्या तुकड्याने मारुन जखमी केले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा करुन घटना स्थळावरून पसार झाले होते.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजने, यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस ठाणे रामनगर यांना सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा तात्काळ शोध घेऊन गुन्ह्यात अटक करण्याबाबत सूचना केल्या होत्या. गोपनिय माहितीच्या आधारे 24 तासाच्या आत गुन्ह्यातील तिन्ही फरार झालेल्या आरोपीचा शोध घेवुन आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी स. पो. नि. राजु बस्तावडे , पो. हवा. राजेश भुरे/606, सुनिलसिंह चौव्हाण/295, जावेद पठाण/592, छत्रपाल फुलबांधे/320, आशिष अग्निहोत्री/1441, पो. ना. बाळकृष्ण राऊत/1538, पो. शी. कपील नागपुरे /2091 यांनी केलेली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें