मुख्याध्यापक केदार गहाने यांचा ”भंडारा जेल मध्ये मुक्काम वाढला”


  • फोटो सोर्स : GB News 

सडक अर्जुनी , ( बबलु मारवाडे ) दि. 15 नोव्हेंबर : केदार मार्तंड गहाने या मुख्याध्यापकाला भंडारा जेल मध्ये मा. न्यायालयाच्या आदेशानुसार रवानगी करण्यात आली असून त्याचे 21 नोव्हेंबर पर्यंत भंडारा जेल मध्ये मुक्काम वाढले आहे. शाळेतील एका मुलीशी त्यांनी अश्लिल चाळे केल्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप आहेत.

सविस्तर वृत्त असे की : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा जमी. येथील श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळेमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक केदार मार्तंड गहाणे वय 47 वर्ष मु. कोल्हारगाव यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा डूग्गीपार पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आरोप आहे की आश्रम शाळेत 10 व्या वर्गात क्षिक्षण घेत असलेल्या एका आदिवासी मुलीशी त्यांनी अश्लील चाळे केले आहे.

काही दिवसापा पूर्वी शाळेच्या एका मुलीबरोबर अशलेला त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या अनुसंघान मीडिया मध्ये बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या. प्राप्त माहिती नुसार त्यांना या प्रकरणात निलंबित देखील करण्यात आले होते. तर आदिवासी संघटनेचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकाला जाब विचारण्यासाठी गेले होते.

मात्र त्यांना शाळेमध्ये घुसण्यास शाळा प्रशासनाकडून मनाई करण्यात आली होती. असे असले तरी अखेर पीडित मुलीच्या तक्रारीवरून डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे मुख्याध्यापक केदार मार्तंड गहाणे यांच्या वर 354 A, 354 D, 506 तसेच पोस्को कलम 10,12, आणि अनुसूचित जाती जमाती कायदा ( ॲट्रॉसिटी ) अन्वय 08 नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपिला डूग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा तपास एस. डी. पी. ओ. संकेत देवळेकर करत आहेत.

पीडित मुलगी ही श्रीकृष्ण आदिवासी आश्रम शाळा कोकणा जमी तालुका सडक अर्जुनी येथे वर्ग 10 मध्ये शिकत आहे. तक्रारदार मुलीने पोलिसांना सांगितले की आरोपी मला ऑफिसमध्ये बोलावून रजिस्टर लिहिण्याच्या बाहण्याने पायाला – पाय लावून – वाईट उद्देशाने स्पर्श करत होते. त्यांनी नियमित हा क्रम सुरू ठेवला. सदर घटना जुलै 2022 ते 17, 10, 2023 या कालावधीतील आहे. मीडिया नुसार भीती पोटी मुलीने ही माहिती कुणाला सांगितली नाही. मुलीच्या तक्रारीवरून डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे विविध कलमा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपीला 09 नोव्हेंबर रोजी मा. न्यायालयात हजर केले असता 21 नोव्हेंबर पर्यंत मा. न्यायालयाने आरोपीला भंडारा येथील कारागृहात रवानगी केली आहे. त्या मुळे मुख्याध्यापक केदार गहाने यांचा जेल मध्ये मुक्काम वाढला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें