गोंदिया, दी. 13 नोव्हेंबर : दिवाळीच्या दिवशीच गोंदिया शहरात मध्यरात्री हत्येचा थरार घडला. एका 23 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. या घटने मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोपी अज्ञात असून त्याचा शोध सुरू आहे. गाडीला कट मारल्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. अर्पित उर्फ बाबू ऊके वय (23) असे मृतकाचे नाव असुन तो गोंदियातील आंबाटोली येथील आहे.
मृतक व आरोपी यांच्यात गाडीला कट मारल्यावरून वाद झाला. ही घटना मध्यरात्री घडली. आरोपीने मृतकावर धारधार शस्त्राने हल्ला केला. यातच घटनास्थळी अर्पित उर्फ बाबू याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना केले आहेत.

Author: Maharashtra Kesari News
Post Views: 58