सडक अर्जुनी , ( बबलु मारवाडे ) दि. 09 नोव्हेंबर : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा जमी. येथील श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळेमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक केदार मार्तंड गहाणे वय 47 वर्ष रहिवासी कोल्हारगाव यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा डूग्गीपार पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाला आहे. त्यांच्यावर आरोप आहे की आश्रम शाळेत 10 व्या वर्गात क्षिक्षण घेत असलेल्या मुलीशी त्यांनी अश्लील चाळे केले आहे. ही घटना संपूर्ण शिक्षण विभागाला सर्मसार करणारी आहे.
काही दिवसापा पूर्वी शाळेच्या एका मुलीबरोबर अशलेला त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या अनुसंधान मीडिया मध्ये बातम्या प्रसारित झाल्या होत्या, प्राप्त माहिती नुसार त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. तर आदिवासी संघटनेचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकाला जाब विचारण्यासाठी गेले होते मात्र त्यांना शाळेमध्ये घुसण्यास शाळा प्रशासनाकडून मनाई करण्यात आली होती.
मात्र अखेर पीडित मुलीच्या तक्रारीवरून डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे मुख्याध्यापक केदार मार्तंड गहाणे यांच्या विरोधात 354 A, 354 D, 506 तसेच पोस्को कलम 10,12 , आणि अनुसूचित जाती जमाती कायदा ( ॲट्रॉसिटी ) अन्वय 08 नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपिला डूग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच तपास एस. डी. पी. ओ. संकेत देवळेकर हे करत आहेत.
पीडित मुलगी ही श्रीकृष्णआदिवासी आश्रम शाळा कोकणा जमी तालुका सडक अर्जुनी येथे वर्ग 10 मध्ये शिकत आहे. तक्रारदार मुलीने पोलिसांना सांगितले की आरोपी मला ऑफिसमध्ये बोलावून रजिस्टर लिहिण्याच्या बाहण्याने पायाला पाय लावून वाईट उद्देशाने स्पर्श करत होते. त्यांनी नियमित हा क्रम सुरू ठेवला.
सदर घटना जुलै 2022 ते 17, 10, 2023 या कालावधीतील आहे. मुलीच्या तक्रारीवरून डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे विविध कलमा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात समोर काय होणार हे पाहण्यासारखे असेल. शिक्षकाच्या या कृत्यामुळे मुली असुरक्षित झाल्याचे चित्र आहे. त्या मुळे आश्रमशाळे मध्ये पालक आपल्या मुलांना शिकवणार का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.