बिरसी विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी – प्रफुल पटेल यांच्यात राजकीय चर्चा


  • बिरसी (गोंदिया) येथे आगमनार्थ केले स्वागत : लोकप्रतिनिधींची उपस्थिती.

गोंदिया, दि. 05 नोव्हेंबर : लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुका होत असून प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी हे रविवारी (दि.५) मध्यप्रदेशातील शिवणी येथे प्रचार सभेला जाण्याकरिता आले होते. प्रचार सभेला जाण्यासाठी गोंदिया येथील बिरसी विमानतळावर सकाळी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. यावेळी खासदार प्रफुल पटेल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी आणि खा. प्रफुल पटेल यांच्यात राजकीय चर्चा झाली.



प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांचे बिरसी विमानतळावर आगमन झाल्यानंतर खासदार प्रफुल पटेल यांनी पुष्पगुच्छ देवून प्रधानमंत्री मा. मोदींचे स्वागत केले. यादरम्यान प्रधानमंत्री मा. मोदी आणि खा. पटेल यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत खा. प्रफुल पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विकास कामे, बिरसी विमानतळावरुन १ डिसेंबरपासून प्रवासी विमान वाहतूक सेवा प्रारंभ होत आहे भविष्यात या विमानतळावरुन कार्गो सेवा सुरु झाल्यास तांदूळ व अन्य कृषी मालाची निर्यात करण्यास मदत होईल. शिवाय रोजगाराच्या संधी निर्माण होवून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल आदी विषयावर चर्चा केली.


 

Leave a Comment

और पढ़ें