गोंदिया, दी. 05 नोव्हेंबर : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम श्रीरामनगर ते सौंदड मुख्य राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 व पहाटे 3 ते 4 वाजता डाक पार्सल घेऊन जाणाऱ्या एका वाहनाच अपघात झाल. अपघातामध्ये वाहन चालक जखमी झाले आहेत. वाहन चालक नामे : देवश्री शाहू वय 32 वर्ष असे सागितले आहे. वाहन नागपूर वरून रायपुर कडे जात असताना पहाटे 3 ते 4 वाजता दरम्यान हा अपघात झाला. अपघात झालेले वाहन क्रमांक एम एच 40 : 7417 असे असून वाहनांमध्ये डाक विभागाचे पार्सल आहे.
सौंदड येथे गोंदिया ते चंद्रपूर असा रेल्वे महामार्ग आहे. महामार्गावर रात्रीला रेल्वेमुळे जाम लागला होता. रात्री अंधार असल्याने वाहन चालकाला मार्गावर उभे वाहन दिसले नाही. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाने समोर असलेल्या उभ्या वाहनाला धडक दिली.
मास कार्गो या कंपनीमध्ये काम करीत असलेले वाहन चालक घटना स्थळी उपस्थित होते. अमित सुग्रिया यांनी सांगितले की रात्रीला त्यांना अपघाता बाबद् फोन आला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावर येऊन जखमी वाहनधारक यांना साकोली येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. घटना स्थळी डूग्गीपार पोलिस रात्री उशिरा पोहचले.