गोंदिया, दी. 5 नोव्हेंबर : जिल्ह्यातील 4 ग्रामपंचायतमध्ये आज सार्वत्रिक निवडणुका होत असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सकाळी 7.30 वाजेपासून मतदार प्रक्रिया सुरुवात झाली असून मतदार राजा आपले हक्क बजविण्याकरिता सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी करत आहेत.
गोंदिया तालुक्यातील माकडी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी देवलगाव, आमगाव तालुक्यातील जांभुळटोला व सडक अर्जुनी तालुक्यातील श्रीरामनगर या 4 ठिकाणी निवडणूक पार पडत आहे.
यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, भाजपचे खासदार सुनिल मेंढे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 43