- वाहनावर 3 लाख 92 हजार रुपयाचा होणार दंड!
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 24 ऑक्टोंबर 2023 : सडक अर्जुनी तालुक्यातील अट्टल वाळू माफिया पोलिस आणि महसूल विभागाच्या सध्या रडारवर आहेत. अर्जुनी मोर. आणि देवरी उपविभागात सध्या युवा ( यंग ) अधिकारी अशल्याने सतत अवैध रित्या वाळूची चोरी करून वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. त्या मुळे या भागातील वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. सोमवारी 24 ऑक्टोबर च्या पहाटे 01 वाजता एस.डी.एम. वरुण कुमार शाहारे अर्जुनी मोर. आणि एस.डी.पी.ओ. संकेत देवळेकर देवरी यांनी संयुक्त कारवाई करीत अवैध रित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर जप्तीची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या वाहनाचा पाठलाग करून महामार्गावरील ग्राम बामणी / ख. येथे वाहन पकडले आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम फुटाळा, सौंदड येथून जाणाऱ्या चुलबंद नदीच्या बंद घाटातून अवैध मार्गाने रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून वाहतुक करन्याची प्रक्रिया काही स्थानिक वाळू माफिया करीत आहेत. याची माहिती गुप्त सूत्रांनी संबंधित विभागाला दिली. त्याची दखल घेत दि. २४ ऑक्टोबर च्या पहाटे ०१ वाजता महसुल विभाग व पोलीस विभाग यांच्या सयुक्त पथकाने फुटाळा येथील रहिवासी दिपक वसंता गहाणे यांचे मालकीचे ट्रक क्रमांक : एम.एच. 36 ए.ए. 1013 ला पकडले दरम्यान वाहन चालक नामे सुखराम तिमा मेश्राम मू. फुटाळा असे आहे. सदर वाहनात 5 ब्रास वाळू मिळून आली आहे. 5 ब्रास वाळू सह ट्रक जप्त करण्यात आला आहे.
सदरची संयुक्त कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर व वरुणकुमार शहारे, उपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोर. यांनी केली आहे. अवैध रेती वाहतुक करणारा ट्रक डिटेन करुन पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे जमा करण्यात आला असुन ट्रक चालक दिपक गहाणे यांचे विरुध्द दंडात्मक कारवाई उपविभागीय दंडाधिकारी, अर्जुनी/मोर. हे करणार आहेत. उपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोर. यांनी सांगितले की सदर वाहनावर 3 लाख 92 हजार रुपयाचा दंड होणार आहे. दरम्यान विचारपूस केली असता, वाहन चालकाकडे वाळू वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना उपलब्ध नवता. तर वाहन चालकाने अधिकाऱ्यांना दिलेल्या माहिती नुसार सौंदड फुटाळा नदी पात्रातील चोरीची वाळू अग्रवाल ग्लोबल या कंपनीला पुरवठा करीत होता. याच वाळूने पुलाचे बांधकाम चालू आहे. सध्या तालुक्यात कुठलाही वाळूघाट लिलाव झालेला नाही.