अडीअडचणीच्या काळात जनतेचा आमदार सदैव तुमच्या पाठीशी असेल – आमदार विनोद अग्रवाल


  • प्रभाग क्रमांक २० मध्ये ४० लक्ष रुपयांचे विविध विकासकार्याचे भूमिपूजन संपन्न…

प्रतिनिधी/गोंदिया, 07 ऑक्टोंबर : जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रात भूमिपूजन आणि लोकार्पणाचा सपाटा लावला आहे. मागील अनेक दिवसापासून कोट्यवधी रुपयांचे विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सुरु आहेत. शहराच्या व ग्रामीणच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात आ. विनोद अग्रवाल यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. उल्लेखनीय आहे की संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात एकमेव अपक्ष आमदार असून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे.

याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात असून मतदारसंघा बाहेरच्या क्षेत्रासोबत दुजेभाव न करता निधी खेचून आणण्याचे कार्य आमदार विनोद अग्रवाल यांनी केले आहे. प्रभाग क्र.२० मध्ये ४० लक्ष रुपयांचे विकासकामांचे भुमिपुजन नुकतेच संपन्न झाले. यात मंतर चौक ते जेठानीजी यांच्या फैक्ट्री पर्यंत 30 लक्ष रास्ता बांधकाम, नागपुरे जी ते राहंगडालेजी च्या घरापर्यंत नाली बांधकाम 5 लाख, दशपुत्रेजी ते कटरेजी यांच्या घरापर्यंत रास्ता बांधकाम 5 लक्ष इत्यादी कामांचा समावेश आहे.

यावेळी सीताराम अग्रवाल, आशीष ठकरानी, रोहित अग्रवाल,  लालू  शर्मा, हर्षपाल रंगारी,  एल यू खोब्रागड़े, मोनू नागदेवने, बुड्ढे जी, लोकू  पटले, विनय दलाल, राहुल जी, छोटू रामटेकर, राहुल यादव, मधुभाऊ तिडके, रिंकू जी, पप्पू कनोजिया, आकाश डाहट , लटारे जी, राजू नेवारे, संतोष सोनवाने, कनु नेवाड़े, संतोष भंडारकर, दीपक खोब्रागड़े ,  डोहरे मामा, जुबेर खान, यदिल शेख, आशीष जी, राजू सोनवाने, शैख जी, बुड्ढे सर,  अनिल मुलकलवार, व अन्य उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें