सडक अर्जुनी, दी. 13 सप्टेंबर 2023 : प्रत्येक गावांचा विकाश होईल तरच राज्य आणी देशाचा विकास होईल. मी आमदार झाल्यानंतर , आमदार स्थानिक विकास निधीतून गाव विकासाचे कामांना प्राधान्य देऊन, जास्तीत जास्त विकासात्मक कामे गावांसाठी केलेली आहेत. मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात जेवढी कामे झाली नाहीत, त्यापेक्षा जास्त कामे मी करुन दाखवीली आहेत. त्यातच पांढरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत १०५ कोटी पेक्षा जास्तचे विकास कामे मी दिलेली आहेत.
“प्रत्येक गावांचा विकाश व प्रगती हेच मतदार संघाचा ध्येय” असे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे भुमीपुजन सोहळा मुंडीपार/ईश्वर प्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना व आमदार स्थानिक विकास निधीतून पांढरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत विविध कामांचे भुमीपुजन सोहळा ता. १० सप्टेंबर रोजी आयोजीत करण्यात आला होता. त्यामध्ये २ कोटी ३४ लक्ष रुपये च्या मंजूर निधीतून घटेगाव ते मुंडीपार/ई. रस्ता, व मुंडीपार/ई. येथे ८ लक्ष रुपयांचा विविध सेवा सहकारी संस्था गोडाऊन तसेच पांढरी येथील गोडेघाट ते श्मशान भुमी कडे जाणारा सिमेंट रस्ता १० लक्ष रुपयांचा.
आदि कामांचे भुमीपुजन करण्यात आले. तसेच गोंगले येथे शिवाजी पुतडा परिसरात आमदार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
त्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सुधाताई रहांगडाले, सभापती संगिता खोब्रागडे, कृउबा संचालक डि. यू. रहांगडाले, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस चे अविनाश काशीवार, कोसमतोंडी पंचायत समिति सदस्या निशाताई काशीवार, युवा तालूका उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस घनश्याम गजबे, माजी सरपंच डां. सेवकराम रहांगडाले, माजी पंचायत समिति सदस्य सुधाकर पंधरे, सरपंच घटेगाव शामराव वासनिक, सरपंच मुंडीपार भुमेश्वरी येडे, ऊपसरपंच कुंजीलाल शहारे, सरपंच डुंडा ऊज्वला हटवार, सरपंच गोंगले शामकला करचाल, ऊपसरपंच मदन येडे, सरपंच रेंगेपार गुलाब तोंडफोडे, नरेश केवट, खिलवंता येडे, हिवराज राऊत, कुवर येडे, भुमेश्वर राणे , रंगलाल पटले, विजय मेश्राम, निरज पारधी, डां. पारधी, तुलशीराम पारधी व गावकरी मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते.