पोलीस पाटील पदभरती अर्ज प्रक्रियेला अखेर या तारखे पासून सुरुवात!


  • ३६ गुण प्राप्त केलेल्या अर्जदारांमधील उच्चतम गुण मिळवलेल्या पर्यंत उमेदवारांना तोंडी परीक्षेला बोलविण्यात येईल.

प्रतिनिधि, अर्जुनी मोर, गोंदिया, ( संतोष रोकडे ) दी. ०७ सप्टेंबर : अर्जुनी मोरगाव उपविभागातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरिता उपविभागीय कार्यालयाच्या वतीने बिंदू नामावलीनुसार आरक्षण काढल्यानंतर उद्या दि. ०८ सप्टेंबर पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. २० सप्टेंबर २०२३ सायंकाळी ४ वाजेपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरवा लागणार आहे.

२१ ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत निघाल्यानंतर उमेदवारांमध्ये गावागावात भरती प्रक्रियेबाबत मोठी उत्सुकता लागून होती त्याची प्रतीक्षा अखेर संपली सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पोलीस पाटील पद भरती करता अहर्ताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज https://arjunimor.ppbharti.in या संकेतस्थळावर जाहिरातही उपलब्ध करून देण्यात आली आहे याच संकेतस्थळावरून केलेल्या अर्जाला ग्राह्य धरण्यात येईल.

पोलीस पाटील पदाकरिता किमान आवश्यक अहर्ता दहावी ( एसएससी ) उत्तीर्ण अर्जदाराचे वय २० सप्टेंबर २०२३ रोजी विचारात घेतले जाईल त्यानुसार २५ पेक्षा कमी आणि ४५ पेक्षा जास्त नसावे अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असला पाहिजे इतर सर्व अटी व शर्ती वरील संकेतस्थळावर देण्यात आले आहेत.

पोलीस पाटील पदाकरिता लेखी परीक्षा ही ८० गुणांची तर तोंडी परीक्षा मुलाखत ही २० गुणांची असेल. लेखी परीक्षेतील एकूण ८० गुणांपैकी किमान ४५ टक्के म्हणजेच ३६ गुण प्राप्त केलेल्या अर्जदारांमधील उच्चतम गुण मिळवलेल्या पर्यंत उमेदवारांना तोंडी परीक्षेला बोलविण्यात येईल. सदरचे बाबतीत विस्तृत माहिती वरील संकेतस्थळावर तथा तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय संबंधित गावाच्या साझ्यातील तलाठी कार्यालय या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

त्यावरील सर्व नियम व अटी शर्ती वाचून उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळवरच जाऊन अर्ज व इतर सर्व प्रक्रियेसंदर्भात माहिती उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे यांनी आज ०७ सप्टेंबर रोजी  झालेल्या पत्रपरिषदेत दिली आहे.

काही गावात बिंदू नामावलीनुसार निघालेल्या आरक्षणावर आक्षेप नोंदविण्यात आला. अशा आक्षेप घेतलेल्या गावातील दिलेल्या आरक्षणा नुसार जर उमेदवारी अर्ज अप्राप्त झाले तर त्या गावातील २१ सप्टेंबर नंतर नव्याने आरक्षण ठरवून अर्ज मागविण्यात येईल व या सगळ्यांची एकत्रित परीक्षा आलेल्या अर्जाच्या संख्येनुसार विचार करून १५ ऑक्टोंबर पर्यंत घेण्याचा मानस असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे यांनी दिली.


 

Leave a Comment

और पढ़ें