गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दी. 27 ऑगस्ट : खा. प्रफुल पटेल हे नुकतेच 23 व 24 ऑगस्ट रोजी गोंदिया – भंडारा दौऱ्यावर असताना. पवार कुटुंबा बद्दल आपले मत वेक्त केले होते. तर आपले घरेलू संबंध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यातच रोहित पवार बद्दल पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी माझ्या घरी यावे जेवण करावे. राहावे असे सांगितले आहे. मात्र 25 ऑगस्ट रोजी एक नवीन बातमी समोर आली आहे. पवार घराण्यातील तरुण नेते रोहित पवार यांना भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघात पक्ष वाढवण्याची जबाबदारी शरद पवार यांनी सोपवली आहे.
काही दिवसांपूर्वीपर्यंत शरद पवार यांचे उजवे हात मानले जाणारे प्रफुल पटेल यांना त्यांच्याच लोकसभा मतदारसंघात शह देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने ( शरद पवार गट ) सुरू केला आहे. पवार यांना भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघात पक्ष वाढवण्याची जबाबदारी शरद पवार यांनी सोपवली आहे. अशी माहिती 25 ऑगस्ट रोजी लोकसत्ता या डिजिटल वेब पोर्टल वरून प्रकाशित झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पटेल हे शरद पवार यांच्यासोबत होते. याचा पटेल यांना राजकीय लाभही झाला. लोकसभा निवडणुकीत अनेकदा ( १९९१, १९९६, १९९८, २००९ वगळता ) पराभव होऊन देखील ते कायम राष्ट्रीय राजकारणात राहिले. राज्यसभेत गेले, मंत्रीपदी राहिले. पटेल मूळचे गोंदियाचे आणि त्यांचा प्रभाव देखील गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यापुरता आहे. असेही लोकसत्ता मध्ये वृत्त आहे.
तर भंडारा जिल्ह्यात प्रभाव नाही. याची प्रचिती लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या पराभवातून आली. पण शरद पवार यांच्या मर्जीतील नेता म्हणून ते कायम दिल्लीत सक्रिय राहिले. त्यातून त्यांनी विधानसभेच्या एक-दोन मतदारसंघावर प्रभाव निर्माण केला. त्यांचे काही समर्थक जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आहेत.
आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रफुल पटेल अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे पवार यांना धक्का बसला आहे. शरद पवारांनी या सर्व बाबींचा विचार करून पटेलांच्या मैदानावर रोहित पवार यांना उतरवले आहे. त्यामुळे आता राजकारणामध्ये काय घडामोडी पाहण्यास मिळतात. हे देखील पाहण्यासारखे असेल.