- सतीश ला सर्पदंश झाला असावा म्हणून डॉक्टरांनी केले उपचार
- उपचाराच्या सतीश ला फायदा झाला असून आज सतीश चे प्राण वाचले
गोंदिया, दि. २१ ऑगस्ट : अचानक सतीश बेशुद्ध पडला आई वडील एकदम घाबरले काय करावं सूचेना अशातच त्यांनी सतीश ला शासकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारासाठी आणले.
डॉक्टरने भरती करून घेतले काही वेळातच सतीश कोमामध्ये गेला डॉक्टरांना समजेनासे झाल अचानक काय झाल असेल येवढ्या लवकर सतीस बेशुद्ध का पडला.
डॉक्टरांपुढे मोठा आव्हाहन होत. अशातच सतीश देशमुख यांच्या तोंडातून निघणारा झाग आणि डोळ्या वरची झापळ वरून डॉक्टरांना वाटलं की कदाचित सर्पदंश तर नाही ना.
पूर्ण शरीर पाहिलं पण कुठे ही सर्पदंश च्या खुणा आढळून आल्या नाही. पण एवढ्या लवकर मुलगा बेशुद्ध होऊन कोमा मध्ये कसा गेला हा प्रश्न डॉक्टरांसमोर होता.
त्यांनी अनुभवाच्या आधारे त्या मुलाला व्हेंटिलेटर वर ठेवून सर्पदंश आणि इतर महत्त्वाची इंजेक्शन दिले. चार दिवस व्हेंटिलेटर वर राहून पाचव्या दिवशी सतीशच्या शरीराच्या हालचाली सुरू झाल्या आणि डॉक्टरांनी सुटकेचा एक श्वास घेतला.
आई-वडिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद पहावयास मिळाला. पाच दिवसाच्या उपचारानंतर सतीश मेश्राम या मुलाचे प्राण वाचले.
त्यामुळे शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर हे सतीश चे जीवनदाते ठरले. आणि सतीश ने आपल्या आयुष्याची लढाई शेवटी जिकलीच हा चिमुकला सतीश मेश्राम वय ७ वर्ष रा. धापेवडा या गावाचा असून आज सर्वसामान्य मुला प्रमाणे आपले आयुष जगत आहे.
मुख्य म्हणजे शासकीय महाविद्यालयामध्ये चांगल्या प्रकारचे उपचार मिळत असल्याने अनेक नागरिकांना आता नागपूर येथे रेफर करण्याची पायपीट थांबली त्यामुळे सतीश च्या परिवाराने डॉक्टरांचे आभार मानले.