सडक अर्जुनी, दि. ०७ ऑगस्ट २०२३ : रूद्र सागर न्युज पेपर ला ६ ऑगस्ट रोजी चार वर्ष पूर्ण झाले. तर पाच व्या वर्षात पदार्पण झाले. तसेच महाराष्ट्र केसरी न्युज ला सहा वर्ष पूर्ण झाली. तर सात व्या वर्षांत पदार्पण झाल. त्या निमित्ताने वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील हॉटेल राज येथे करण्यात आले होते. कार्यक्रमात आमदार मनोहर चंद्रिकापूरे उपस्थीत होते.
आदर्श पुरस्कार प्राप्त तलाठी उमराव वाघधरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मोठया संख्येने पाहुणे उपस्थित होते. तर पुढील वाट चाली करिता सर्वांनी शुभेच्या दिल्या. ६ ऑगस्ट रोजी वर्धापन दिन व संपादक बबलू मारवाडे यांचे जन्मदिवस असे दोन्ही कार्यक्रम यावेळी आयौजीत करण्यात आले होते. यावेळी केक कापून वर्धापन व जन्मदिवस साजरा करण्यात आला.
त्या पूर्वी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली तर आमदार मोहोदयांचे अनेकांनी पुष्प गुच्च देऊन स्वागत केले. उमराव एस. वाघधरे तलाठी सा. क्र.०६ मौजा सौंदड यांचा गोंदिया जिल्हया अंतर्गत तलाठी सर्वगातील उत्कृष्ट सेवेबद्दल सन २०२३ चा आर्दश तलाठी पुरस्कार १ मे २०२३ रोजी जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत देवून गौरविण्यात आला आहे. आज कार्यक्रमाचे औचित्य साधत उत्कृष्ठ कार्य करणारे तलाठी वाघधरे यांचा सत्कार आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी तलाठी उमराव वाघधरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी माजी सरपंच व ओबिसी कृती समितीचे तालुका अध्यक्ष दिनेश हुकरे, महाराष्ट्र केसरी न्युज आणि रूद्र सागर न्युज पेपर चे संपादक बबलु मारवाडे, महाराष्ट्र का मानबिंदू आणि एम के एम न्यूज चे संपादक सुशील लाडे, निशांत लांजेवार संपादक आकाश न्यूज पेपर भंडारा, आकाश लांजेवार सह संपादक आकाश न्यूज चॅनल भंडारा, माजी प. स. सदस्य मंजू डोंगरवार, यौग शिक्षिका जोती ईरले, रोशनी सारंगपुरे, पत्रकार लालसिंग चंदेल, पत्रकार चंद्रमुनी बनसोड, पत्रकार शाहीद पठाण, पत्रकार शाहीद शेख, पत्रकार देवेंद्र दमाहे, विशाल उजवणे माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ चे तालुका अध्यक्ष, कृषी सहाय्यक राजशेखर राणे, एस एन न्यूज चे संपादक हेमंत ईरले, सौंदड ग्राम पंचायत चे सदस्य सुभम जनबंधू, दिगंबर पातोडे, ऋषभ राऊत, आशीष राऊत, अमोल मेंढे, सचिन कोरे, इंजिनीयर राहुल कोरे, जयपाल मारवाडे, गंगाधर मारवाडे, उमराव मांढरे, संदीप कठाने, रोहीत कठाने, कविता कठाने, वंदना मारवाडे, वछला मारवाडे, रोशनी मारवाडे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदारांनी मंचावरून बोलताना सांगितले की पत्रकार जेव्हा एखाद्या शाकीय कर्मचाऱ्यांचे ( तलाठ्याचे ) सत्कार करते तेव्हा त्यांनी काही विशेष कार्य केले असावे यावरून हे सिद्ध होते. मी जेव्हा कृषी विभागात अधिकारी होतो तेव्हा पत्रकारांना त्या दृष्टीने पाहत होतो, आता मी आमदार आहे. तर ती दृष्टी बदलली आहे. कदाचित मी समोर एखादा बाबा झाल्यास ही दृष्टी देखील बदलेल. माणसाची दृष्टी वेळे नुसार बदलली पाहिजे. दरम्यान त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वर्धापन दिन व जन्मदिन निमीत्ताने त्यांनी भर भरून शुभेच्या दिल्या.
यावेळी मंचावरून दिनेश हुकरे यांनी देखील मार्गदर्शन केले त्यांनी पत्रकारिता बद्दल विशेष आपले विचार मांडले ते म्हणाले आजकालची पत्रकारिता ही चाटू गिरीची आहे. मोठे चायनल हे गुलाम झाले आहेत. मात्र डिजिटल मीडिया च्या माध्यमातून अनेक पत्रकार समाजातील जनतेला आजही न्याय मिळून देण्यासाठी काम करत आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्र केसरी न्युज व रूद्र सागर न्युज पेपर चे संपादक बबलु मारवाडे हे देखील आपली स्पस्ठ भूमिका मांडतात. त्या मुळे अश्या काही लोकांमुळेच पत्रकारिता जिवंत आहे. रवीश कुमार सारख्या पत्रकारांना विकत घेता येत नसल्याने संपूर्ण चॅनल विकत घेतला जातो. असे उदाहरणे देशात आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. सुशील लाडे यांनी केले तर आभार चंद्रमुनी बनसोड यांनी मानले.