गोंदिया, दी. 30 जुलै 2023 : दोन मुलांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथिल आर्यन शहारे, वय 16 वर्ष, व गंगाधर भरणे, वय 16 वर्ष दोन्ही मुले ( 29 जुलै ) गावालगत असलेल्या नाल्याजवळ शेळ्या चाराईला गेले होते. पण जवळच असलेल्या नाल्याय पाणी वाहत होता. या पाण्यात दोन्हीं मुले उतरली पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोन्हीं मुले पाण्यात वाहून गेली. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असुन आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. असून स्वविच्छेदणासाठी गोंदिया जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर एकाचं वेळी दोन मुलांच्या मृत्युमुळे गावात शोककळा पसरली आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 44