कृषि विभागा मार्फत शेतकर्यांना १ रुपयात पिक विमा काढण्या बाबत मार्गदर्शन


सडक अर्जुनी, दिनांक : 22 जुलै 2022 : तालुक्यातील ग्राम शेंडा /कोयलारी अंतर्गत येणाऱ्या कृषि सहायक राजशेखर राणे मार्फत शेतकर्यांना पिक विमा काढण्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषि विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात / देशात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवली जाते. वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळावी याकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे .

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी कृषी विभाग गावागावात जाऊन प्रचार प्रसिद्धी करण्याचे काम करत आहे. प्रचार प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने केली जावी यासाठी प्रत्येक तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने प्रचार रथ फिरवून तसेच कर्मचारी शेतकरी सभा घेऊन पिक विमा योजना कश्या पद्धतीने शेतकर्यांच्या फायद्याची आहे असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत आहे.

कोयलारी चे कृषि सहाय्यक राजशेखर राणे यांनी शेंडा या अधिवासी क्षेत्रात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत १००% शेतकर्यांनी भाग घ्यावा या साठी स्व:ता प्रत्यक्ष प्रचार रथा सोबत जाऊन या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना समजाऊन सांगतात. योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे संरक्षण आणि दाव्यासाठी पूर्व अटी विमा संरक्षित रक्कम या सर्व विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तसेच सोबत संघणक चालकाच्या मदतीने शेतकर्यांचे पिक विमा काढण्याचे काम करून घेतले.

शेतकर्यांनी नवीन रुजू झालेले कृषि सहाय्यक राजशेखर राणे यांचे गावात स्वागत करून त्यांचे कामाचे कौतुक केले प्रसंगी दीपक लिल्हारे संघणक चालक, सुबोध खोब्रागडे विमा प्रतिनिधी, शुभम मेश्राम संघणक चालक, धनलाल मानवटकर, नारायण पंधरे, तुळशीदास पंधरे, शैलेश ऊईके, दीपक बांते, संजय मानवटकर, प्रल्हाद बोरकर, रामलाल मरसकोल्हे, सुधाकर संयाम जीरालाल मेश्राम, सोमा वटी, सेवकराम परतेकी, मोहनलाल रामटेके, संदीप सोनवणे, राकेश वरखडे, चैत्राम मरसकोल्हे, योगेश दशरिया, रजनीकांत वालदे सरपंच कोयलारी, हेमू वालदे सामाजिक कार्यकर्ते , शिवलाल चौधरी, इनसाराम कोवाचे, सिद्धार्थ बडोले, राजू वालदे, गोकुळ तरोने , टेकचंद कोहळे, आशिष बडोले, रणजित कोहळे, देवानंद गहाने, धनलाल परशुरामकर उपस्तीत होते.


 

Leave a Comment

और पढ़ें