खतांच्या कंपनीकडून वसूलीचा प्रयत्न! अब्दुल सत्तारांच्या स्वीय सहाय्यकाकडून बोगस धाडी


अकोला, दिनांक : १० जून : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहाय्यक दीपक गवळी यांनी शनिवारी अकोल्यातील एमआयडीसीमधील गोदामांवर बोगस धाड टाकली. कृषी विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगत या बोगस पथकाने काही गोदामे सील केली. तसेच अक्षत फर्टिलायजर्स या कंपनीकडून तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली. मात्र एबीपी माझा या वृत्त वाहिनीचे पत्रकार तिथे पोहोचले व त्यांनी या बोगस कारवाईचा भंडाफोड केला. जेव्हा एबीपी माझाच्या पत्रकारांनी या बोगस पथकाला कारवाई बाबत विचारले तेव्हा त्यांची बोबडीच वळली.

या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बोगस कारवाईत अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहाय्यक दीपक गवळी यांच्यासोबत ओएसडी प्रशांत ठाकरे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन व बोगस खतं व किटक नाशकं विकल्याप्रकरणी नागपूरमध्ये गुन्हा दाखल अशलेला हितेश खट्टड यांचा समावेश होता.

सामना या वृत्त पत्राने १० जून रोजी दिलेल्या माहिती नुसार – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘अकोल्यात आज जे आले होते ते अब्दुल सत्तारांचं खासगी पथक होतं. त्या पथकामार्फत पैसा गोळा करण्याचं काम अब्दुल सत्तार करत आहेत. पहिला असा कृषी मंत्री असेल जे इतकं नीच घाणेरडं काम करत आहेत. त्यामुळे कृषी मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी नितीन देशमुख यांनी केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें