आता दहावी-बारावीला कमी टक्के पडले तरी नो टेन्शन! शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षा देता येणार


मुंबई, वृतसेवा, दिनांक : ०७ एप्रिल २०२३ : दहावी-बारावीसारख्या बोर्डाच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांवरील दडपण कमी करण्यासाठी शैक्षणिक वर्षात दोन वेळा बोर्ड परीक्षा देण्याची सवलत देण्यात यावी, अशी शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. बोर्डाच्या मुख्य परीक्षेत विद्यार्थ्याला मिळालेले गुण कमी असल्याचे वाटल्यास तो विद्यार्थी गुण ( श्रेणी )  सुधारणेसाठी दुसरी परीक्षा देऊ शकतो.

बोर्डाच्या परीक्षा सोप्या करण्यात याव्यात, जेणेकरून वर्षभराची शिकवणी, अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी सतत असलेला ताण कमी व्हावा यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात काही उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. शिक्षणासाठी वर्गात मूलभूत प्रयत्न करीत असलेल्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे सहज शक्य असेल आणि कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नांशिवाय त्याला बोर्ड परीक्षेत चांगली कामगिरी करता येईल यावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रकाश टाकण्यात आला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांचे परीक्षेचे दडपण कमी करण्यासाठी परीक्षांची तीव्रता कमी करण्यासंदर्भात सुचविण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून बारावीच्या काही विषयांतील बोर्ड परीक्षा दोन भागांमध्ये तयार केल्या जाऊ शकतात. एक भाग बहुपर्यायी प्रश्नांचा तर दुसरा भाग हा वर्णनात्मक प्रश्नांचा असणार आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें