रामदेवबाबा अध्यापक विद्यालयाची छात्राध्यापिका डी. एल. एड. परीक्षेत जिल्ह्यातून द्वितीय


सौंदड, दिनांक : २३ मार्च २०२३ : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, सौंदड येथील छात्राध्यापकांनी जानेवारी – २०२३ मध्ये आयोजित डी. एल.एड. द्वितीय वर्षाच्या परीक्षेत चांगलेच शुयश संपादन केले आहे. यात कु. काजल संपत डोंगरवार हिने ८७.३० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक, कु. शिवानी मंगेश डोये हिने ८६.८५ टक्के गुण घेऊन विद्यालयातून द्वितीय क्रमांक, तर टींकेश विलास उपरीकर याने ८६.४५ टक्के गुण घेऊन विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
छात्राध्यापकांनी विद्यालयाच्या जिल्हास्तराच्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे.

याबद्दल जगदीश लोहिया, संस्थापक/ संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था सौंदड, पंकज लोहिया सदस्य लो. शि. संस्था , सौंदड, आर. जे. लोहिया विद्यालयाचे प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, रामदेवबाबा अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, लोहिया प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका कल्पना काळे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी व उत्तीर्ण छात्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना भावी यशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी सतत प्रयत्नशील राहावे अशी सदिच्छा जगदीश लोहिया, संस्थापक/ संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था यांनी व्यक्त केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें