गौतम अदानी जगातील पहिल्या 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर


मुंबई वृतसेवा, दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२३ : अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे जगातील पहिल्या 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. अदानी समूहाने शेअर्समध्ये मोठय़ा प्रमाणात फेरफार केल्याचा अहवाल अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने 25 जानेवारीला जाहीर केला होता. त्यामुळे अदानी समूहाच्या 9 कंपनींचे समभागांची घसरण सुरू आहे. त्यांच्या एकूण संपत्तीत आतापर्यंत 84.4 अब्ज डॉलर्सची घसरण झाली असून ते सध्या जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र, आज अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली आहे. दरम्यान, अदानी समूहाच्या एफपीओमध्ये अबू धाबीची कंपनी आयएचसीने 3 हजार 261 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.


 

Leave a Comment