सौंदड येथे सरपंच पदासाठी 6 उमेदवार रिंगणात


सडक अर्जुनी, गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दींनाक: 12 डिसेंबर 2022 : संपूर्ण राज्यात ग्राम पंचायत सर्वत्रिक निवडणुका लागल्या आहेत. राज्यातील 7751 ग्राम पंचायत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकट्या गोंदिया जिल्ह्यात 348 तर जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात 43 ग्राम पंचायतीच्या निवडणुका आहेत. त्या मुळे तालुक्यात सर्वाधिक लोक संख्येने मोठे असलेले आणि चर्चेत असलेल्या एकट्या सौंदड गावात एक सरपंच पदासाठी तब्बल 6 उमेदवार रिंगणात उभे आहेत. तर 15 सदस्य पदासाठी तब्बल 48 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप, आणि काँग्रेस, अश्या 3 पक्षाचे कार्यकर्ते प्रतिनिधित्व करीत आहेत.

भाजप पक्षाचे काही कार्यकर्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा देत आहेत. त्यातच भाजपच्या उमेदवाराला गावातील काही कार्यकर्त्यांचा पाठिंबा नाही असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे. त्या मुळे भाजप पक्षाचा एकटा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. पक्षाच्या आतील हेवेदाव्या मुळे हा प्रकार पाहण्यासाठी मिळत आहे. त्यासह गावात अन्य सरपंच पदासाठी देखील उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

गावात निवडणुकीसाठी उभे असलेले 3 पक्ष बक्कळ पैसा उडवणार असल्याच्या चर्चा आहेत. निवडणुकीत तब्बल एक कोटी रुपयाचा अमाफ खर्च होणार असल्याची चर्चा आहे. भाजप, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीचे दमदार उमेदवार गावात आहेत. एका मारवाडी समाजाच्या उमेदवाराला हरवीण्यसाठी दुसऱ्या मारवाडी समाजाच्या उमेदवाराला उभे करण्यात आले अश्ल्याची चर्चा गावात आहे.

म्हणजे ओबीसी, एससी, एसटी लोकांच्या मतदार संघात दोन मारवाडी समाजाच्या उमेदवारात हा संघर्ष पाहण्यासाठी मिळणार आहे. काही लोकांना पूर्वी मारवाडी समाजाचे लोक चालत होती. मात्र पाच वर्ष गावात सत्ता गाजविल्याने आता मारवाडी समाज चालत नाही. अशी अफवाशीर  चर्चा आहे. पूर्वी गावातील मारवाडी समाजाच्या लोकांबरोबर खेटून बसणारे कथित लोक प्रतिनिधी आता ओबीसी समाजातील लोकांचे मन जिंकण्यासाठी नवीन रणनीती वापरत आहेत. मात्र तब्बल 5 वर्ष गावात हुकूम शाही चालविणारे आणि भ्रष्टाचार करून आपला खिषा भरणारे कथित उमेदवार ओबीसी, एसटी आणि एससी लोकांना चालणार का ? हा देखील संशोधनाचा विषय ठरला आहे. गावात चर्चा आहे की गेली १० वर्षे पासून गावात महिला सरपंचानी पद भूषविले आहे. त्या मुळे गावात पुन्हा महिला सरपंच नको.

यावरून असे लक्ष्यात येते की ही टक्कर फक्त दोन मारवाडी समाजाच्या उमेदवारात होणार आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद च्या निवडणुकी दरम्यान ओबीसी बाबद खोटा प्रचार करून मतदारांना भटकाविण्याचा काम काही समाज कंटकांनी केला होता. तरी देखील दरम्यान काळात राष्टवादीच्या गडाला भेदून भाजपचे दोन उमेदवार निवडून आले होते. आता देखील भाजप आणि राष्टवादी पक्षात टक्कर होणार आहे. त्यामुळे येत्या काळात कॉंग्रेश आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारात आपसी गठबंधन होणार का हे पाहणे आहे.


 

Leave a Comment