विधार्थ्यांना जनावरान प्रमाणे ट्रक मध्ये कोंबून नेणारे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक निलंबित तर गुन्हा ही दाखल.


  • ३ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची स्वतंत्र चोकशी होणार… 

गोंदिया, दिनांक : २७ सप्टेंबर २०२२ : मुख्याध्यापक एस. के. थूलकर व क्रिडा शिक्षक एन.टी. लिल्हारे यांनी आपल्या कर्त्यव्यात कसूर केल्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांनी दोषी शिक्षकांवर कार्यवाही करण्याबाबत आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त यांना आदेश केले असता तात्काळ आयुक्त यांनी घटनेचे गाभिर्य लक्ष्यात घेता दोघांना निलंबित केली आहे. अश्यात ३ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची स्वतंत्र चोकशी करण्यात येणार अश्ल्याची महिती समोर येत आहे.

प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहिती नुसार दिनांक २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर पर्यंत आदिवाशी आश्रम शाळा येथे क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा तिरोडा तालुक्यातील कोयलारी येथील आश्रम शाळेत २४ सप्टेंबर रोजी संपन्न झाली, मजीदपूर येथील आश्रम शाळेतील एकूण उच्च माध्यमिक गटातील १२० विद्यार्थी खेळात सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये सहभागी विधार्थ्यांचे ने – आन करण्याची संपूर्ण जवाबदारी हि मुख्याध्यापक व संबधीत क्रिडा शिक्षकाची होती.

मात्र प्रवास करण्यासाठी बसची सुविधा न पुरविता खाजगी ट्रक मध्ये १२० विधार्थी कोंबून भरण्यात आले होते.  २४ सप्टेंबर ला क्रिडा स्पर्धा संपताच या १२० विद्यार्थ्याना जनावरांप्रमाणे ट्रक मध्ये पुन्हा भरण्यात आले होते. दरम्यान खेळात थकलेल्या विधार्थ्यांना ट्रक मध्ये प्राणवायूची कमतरता निर्माण झाली. अश्यात १२ विधार्थ्यांची प्रकृती खालावली त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हलविण्यात आले होते. त्यातच एका विद्यार्थिनीला गोंदिया येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. या सर्व प्रकरणाची दखल आमदार विजय राहांगडाले यांनी घेतली.


 

Leave a Comment