माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : २७ सप्टेंबर २०२२ : डव्वा येथे खासदार सुनिल मेंन्ढे यांची स्थानिक विकास निधी तसेच पंचायत समितीचे उपसभापती शालिंदर कापगते यांच्या निधीतून डव्वा, गोपाल टोली, पळसंगाव येथे बधिस्त नाली गटारे, वाढीव पाईपलाईन दुरुस्ती, सिमेंट काँक्रीट रस्ता अश्या विविध २५ लक्ष रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते २६ सप्टेंबर रोजी संपन्न झाले.  यावेळी तालुका पंचायत समिती चे उपसभापती शालिंदर कापगते, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्वर पटले, पंचायत समिती सदस्य चेतन वळगाये, माजी उपसभापती राजेश कठाणे, विलास चौव्हाण, विवेक राऊत, गुड्डु डोंगरवार, हरिचंद लांजेवार, मयुर रामटेके, मेघनाथ उदिरंवाडे, मुकेश अग्रवाल, मोरेश्वर वाघाडे यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.


 

Leave a Comment