गोंदिया : हत्तीच्या कळपाने केली भात शेतीचे मोठे नुकसान


अर्जुनी मोर, गोंदिया, दिनांक : २५ सप्टेंबर २०२२ : गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेला 23 हत्तींचा कळप गाढवी नदीच्या तीरावर वसलेल्या खोडदा गावात गेल्या दोन दिवसांपासून वावरत होता. अश्यात महागाव शेतशिवारात या हत्तीच्या कडपाणी प्रवेश करून महागाव येथील काही शेतकऱ्यांच्या धान पिकाचे नुकसान केले. दिनांक 24 सप्टेंबर च्या रात्री महागाव शेतशिवारातून या हत्तीच्या कडपाने येगाव खामकुरा गावाकडे प्रस्थान केले.


गोंदिया : हत्तीच्या कळपाने केली भात शेतीची मोठ्या प्रमाणात नासाडी 


त्यामध्ये येगाव येथील काही शेतकऱ्यांच्या धान पिकाचे सुद्धा नुकसान केले. खामकुरा व येगाव येथील शेतकरी बांधवांनी रात्रीच्या वेळी गस्त केल्याने हा हत्तीचा कळप पुन्हा खोडदा गावाकडे प्रस्थान झाल्याचे समजले आहे. हत्तींच्या या आगमनाने अर्जुनी मोर तालुक्यात दहशतीचे वातावरण असून वन विभागाने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या दोन दिवसा आधी अरुण नगर येथील विनय मंडळ याचा वाघाने फडशा पडला. त्यातच तोंडाशी आलेला धान पीक हत्तीचा कळप उध्वस्त करत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा झालेला आहे. या संदर्भाने प्रस्तुत प्रतिनिधी ने अर्जुनी मोर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी खोब्रागडे यांच्याशी भ्रमण ध्वनी वरून संपर्क साधला असता हत्तीच्या कडपामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यांना वन विभागा मार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल असी माहिती दिली आहे.


 

Leave a Comment