- थकित विज बिलाची सक्तिने वसूलीचा जाब विचारायला गेलेल्यां गोंदियाच्या अपक्ष आमदाराने उपकार्यकारी अभियंताला मारहाण प्रकरण…
- चाबी संघटनेचे आमदार विनोद अग्रवाल यांच्यावर आरोप…
गोंदिया विशेष प्रतिनिधी, दिनांक : ३० ऑगस्ट २०२२ : गोंदियात आमदार- कर्मचारी वाद चांगलाच रंगल्याचे पहायला चित्र मिळाले आहे। थकित विज बिलाची सक्तिने वसूलीका करता असा जाब विचारायला गेलेल्यां गोंदियाच्या अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरणाचा उपकार्यकारी अभियंताला मारहाण केल्याची घटना गोंदियात घडली असून संतप्त कर्मचारी तक्रारीसाठी रामनगर पोलिस स्टेशन ला गेल्याने प्रकरण आपल्या अंगलटी येण्याचे बघून आमदार विनोद अग्रवाल यांनी पाऊल मागे घेत संबधित कर्मचाऱ्याची माफी मागितल्याने प्रकरण मिटले आहे।
ग्राम मुर्री येथील लारोकर नामक ग्राहक याचे थकित विजेचे बिल असल्याने महावितरणाचे अधिकारी लारोकर यांच्या घरी वसूली साठी धड़कले होते। दरम्यान लारोकर यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना मदत मागितली असता मतदार संघातिल मतदाराला खुश करन्याच्या नादात आमदार महोदय यांनी सूर्याटोला येथील पॉवर हाउस गाठत उपकार्यकारी अभियंता राजेश कंगाले यांना जाब विचारला।
दरम्यान आमदार महोदयाचा तोल जात त्यांनी चक्क उपकार्यकारी अभियंता राजेश कंगाले यांना मारहाण केली असा आरोप करण्यात आला आहे | शासकीय काम करणाऱ्या आपल्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची ही बातमी संपूर्ण कार्यालयात वाऱ्यासारखी पसरली। लागलीच संपुर्ण कर्मचारी एकत्र येत आमदार विनोद अग्रवाल यांचा असभ्य वर्तवणुकीचा संताप व्यक्त करत रामनगर पोलिस स्टेशन गाठत आमदार महोदयाची तक्रार दिली। वाढता कर्मचारी दबाब व रात्रीच्या वेळी जमा होत असलेल्या कर्मचाऱ्याचा जमावड़ा लक्षात घेता रामनगर पोलिसांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार नोंद केली।
ही माहिती आमदार महोदयाना होताच त्यांच्या पायाखालील वाळू सरकली व आपली भविष्यात होणारी फजीती लक्षात घेता स्वता रामनगर पोलिस स्टेशन गाठत संबधित मारहाण झालेल्या अभियंताची जाहिर माफी मागितली आहे। त्यामुळे संबधित उपकार्यकारी अभियंताने देखील मोठ्या मनाने तक्रार मागे घेतली। याबाबत आमदार महोदयानी आपन कोणाला मारहाण केली नसल्याचे बोलले खरे,, मात्र त्यांनी मागितलेल्या माफिने हे प्रकरण निवळले आहे हे ही तितकेच खरे. यात तक्रारदार राजेश कंगाले मारहाण झालेला उपकार्यकारी अभियंता यांनी पत्रकारांना माहिती दिली की दिलेली तक्रार आपण मागे घेतली आहे. हा प्रकरण २९ ऑगस्ट २०२२ रोजी घडला असून आमदारांच्या माफीनाम्या नंतर शांत झाल्याचे बोलले जात आहे.