सडक/अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दिनांक : ०१ सप्टेंबर २०२२ : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम डूग्गीपार/ कोहमारा येथील तलावात बुडून ३८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना ३१ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ०१ वाजता दरम्यान घडली आहे. ३१ रोजी जिल्ह्यात सर्वत्र खुसीचा माहोल होता. महिला वर्ग गौरी विशर्जनासाठी तलाव सह नदी नाल्यावर उपस्थित होत्या, अश्यात तालुक्यात विपरीत घटना घडली.
मृतक इसमाचे नाव सतीश गोपाल कृरसुंगे वय वर्ष ३८ वार्ड क्रमाक : ३ कोहमारा असे आहे. सतीश आपल्या घरच्या सद्श्यांसह जवळील तालावर गौरी विसर्जनासाठी गेला होता. गौरी कार्यक्रम हा महिलांचा कार्यक्रम असते अश्यात त्याच्या आईच्या अंगात देवी येत अश्ल्याने तो आणि अन्य एक पुरुष असे दोन लोक दरम्यान उपस्थित होते. असे त्यांच्या नातेवाईकानी सांगितले आहे. सर्व कार्यक्रम आटोपल्या नंतर त्याने स्वत तलावात आंगोळ करण्यसाठी उडी घेतली. दरम्यान सतीश लांब पर्यंत तलावात पोहत गेल्याने त्याला दम आला. अश्यात लांब गेलेला सतीश तलावाच्या कडेला परत आलाच नाही. दरम्यान त्याचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला.
गावात ही बाब वार्यासारखी पसरली आणि खुसीच्या वातावरणात दुखाचे डोंगर कुरसुंगे परिवारा ओधावले. सतीशला शोधायला जिल्ह्यातील शोध व बचाव पथकामार्फत संध्याकाळ पर्यंत संपूर्ण तलावात तपास करण्यात आला मात्र सतीश चे मृतदेह मिळाले नाही. अश्यात दुशर्या दिवसी देखील शोध पथकाने तपास केला. दरम्यान तपास पथकाने गावातील मासे मारणार्या लोकांना पाचारण केले.
दरम्यान तलावात जाळी टाकल्यानंतर काही कालान्तराने मृतदेह आज ०१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास मिळाले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सडक अर्जुनी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. नातेवाईकांनी माहिती देतान्हा सांगितले की मृतदेह हातात मिळाल्यानंतर स्थानिक मोक्षधाम येते अंतिम संस्कार केला जाईल. घटनेची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस अमलदार मनोहर गावळकर आणि पोलीस नाईक घनश्याम उईके डूगीपार पोलीस करीत आहेत.