लोहिया विद्यालयात वसंत पंचमी कार्यक्रम संपन्न

सौंदड, दि. 04 फेब्रुवारी  : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 फेब्रुवारी रोजी विद्यालयात जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने वसंत पंचमी हा सण साजरा करण्यात आला.

विद्यालयाच्या प्राचार्या उमा बाच्छल यांच्या अध्यक्षतेखाली तर गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्ण, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल, स. शि. सौ. कल्पना काळे यांच्या प्रमुख उपस्थितित विद्येची देवता माँ सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना गायली, विद्यालयाच्या प्राचार्या यांनी आधुनिक काळात विद्यार्थ्यांनी भरकटून न जाता आपले लक्ष्य गाठावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर – कर्मचारी व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वाना कार्यक्रमा नंतर प्रसाद वितरण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका यु. बी. डोये यांनी केले तर आभार प्राध्यापक डी. ए. दरवड़े यांनी मानले.

Leave a Comment

और पढ़ें