- सौन्दड येथे संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न.
- आ. राजकुमार बडोले सह अनेकांचा सत्कार
सडक अर्जुनी, दि. 02 फेब्रुवारी : तुकोबारायाचा विचार आणि आपला विचार कधी जमतच नाही, जुळतच नाही, इतका प्रचंड फरक, तुकोबारायाचा प्रत्येक क्षेत्रामधला आपण जर विचार पाहिला तर तो इतका व्यासांगिक आहे, अवघ्या 40, 41 वर्षाचा आयुष्य आणि या आयुष्यामधे इतके व्यासंगीक लोक ज्यांनी पीएचडी केल्या, मात्र तो कधी शाळेत गेला नाही, असे प्रतिपादन आमदार राजकुमार बडोले यांनी मंचावरून केले ते सौन्दड येथे आयोजीत संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यात अध्यक्ष स्थानी मंचावरून बोलत होते ते पुढे म्हणाले. अवघ्या 41 वर्षाच्या आयुष्यामध्ये इतके अभंग लिहिले, इतक्या गाता लिहिल्या आणि त्याच्यावर असंख्य लोक पीएचडी झाली, किती प्रचंड मोठा तत्वज्ञानी, अजून ही त्याच्या गातेवर विचार केला जातो कि त्यांनी कोणत्या कोणत्या क्षेत्रात किती लिहलंय, इतकि प्रचंड विध्वता घेणारा माणूस, माहापुरुष, राष्ट्रसंत, किंवा जगतगुरु आपण म्हणतोय, जगतगुरु हा सब्द आपण का वापरतोय कारणार त्याला जगाचा गुरु म्हंटल जाते असेही त्यांनी आपले विचार वेक्त केले.
आज दि. 02 फेब्रुवारी रोजी सौन्दड येथे कुणबी समाज भवनात संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा आयोजीत करण्यात आला होता दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार बडोले आमदार अर्जुनी मोर. विधान सभा हे होते तर दीपप्रज्वलन लायकराम भेंडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख पाहूणे पंचायत समिती सदस्य वर्षा ताई शाहारे, सरपंच हर्ष मोदी सौन्दड, प्रतिभाताई भेंडारकर सरपंच कोहमारा, माजी जी.प. सदस्य रमेश चुऱ्हे, दीपाली ताई टेम्भूर्ने जी.प. सदस्य गोंदिया, युवा उधोगपती संदीप मोदी, सौन्दड येथील कुणबी समाजाचे अध्यक्ष विनय भेंडारकर, कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष रामकृष्ण चुटे, महिला अध्यक्ष रंजूताई भोई, शुभम जणबंधू ग्रा.प. सदस्य, प्रमिलाताई निर्वाण, खुशाल ब्राह्मणकर, संपादक बबलु मारवाडे, मयूर डोये सचिव, राकेश शिवणकर सह सचिव, शैलेश पातोडे कोषाअध्यक्ष, नरेश शिवणकर, छायाताई कोरे उपाध्यक्ष, रेखाताई मारवाडे सचिव, वर्षाताई पातोडे सहसचिव, अस्मिताताई मेंढे सह समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान आमदार राजकुमार बडोले यांचे शाल व श्रीफळ देऊन समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आले.
सकाळी संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी घेऊन दिंडी पटेल वार्डातून निघाली, दुपारी गोपाल काल्याचे कार्यक्रम संपन्न झाले तर संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा तसेच गुणवंत विधार्त्यांचा पुरस्कार व राशी देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. स्व. फाल्गुनराव पटोले यांच्या स्मृती प्रित्यर्थ आ. नाना पटोले यांच्याकडून दहावी आणि बारावी मधे प्राविण्य प्राप्त विधार्थी कु. आरती उमेश चुटे, कु. तृपती राजेश चुटे, निशांत नरेश शिवणकर, ममता अनिल डोये यांना पुरस्कार राशी देऊन सत्कार करण्यात आला, तर सेवा निवृत्त अंगणवाडी सेविका मानोरमा चोप्राम फुडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सेवा निवृत्त स. शिक्षक विजय मारवाडे जिल्हा परिषद शाळा पिपरी यांचे शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले, तसेच शीश्यवृत्ती प्राप्त व नवोदय निवड झालेले विधार्थी कु. दृष्ठी देवेंद्र ब्राम्हणकर, लक्ष्मी विशाल ब्राम्हणकर यांचा सत्कार करण्यात आला, विजय डोये संचालक जी.प. व शासकीय सह पत. संस्था मर्यादित भंडारा यांच्याकडून शाल, श्रीफळ, भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे संचालन स.शिक्षक विजय मारवाडे यांनी केले तर आभार मयूर डोये यांनी मानले, सायंकाळी महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले.
