सडक/अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दिनांक : २९ ऑगस्ट २०२२ : तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील धान खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या समस्सेवर अखेर आज निर्णय लागला आहे. तब्बल १८००० क्विन्टल धान खरेदीचे उदिस्ट मिळाले अश्ल्याने आता परिसरातील शेतकऱ्यांची होणारी गैर शोय आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांनी मार्गी लावली आहे. त्या मुळे अनेक शेतकऱ्यांनी आमदार मोह्दयांचे आभार देखील मानले आहे.
सविस्तर प्रकरण काय आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन च्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील काही धान खरेदी केंद्रावर तांत्रिक कारणाने गडबडी झाल्या मुळे त्यांच्या कडून धान्य खरेदी करण्याचे अधिकार नुकतेच गोठविले आहे. यात सौन्दड येथील दी. सहकारी भात गिरणी मर्या. चा देखील सावेश आहे. येथे जुलै महिन्यात ३२५ शेतकऱ्यांचे ९२०० क्विन्टल धान खरेदी ऑफलाईन स्वरुपात करण्यात आले होते. हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात झाला होता. लोकमत वृत्त पत्राने २५ ऑग. रोजी दिलेल्या माहिती नुसार धान खरेदीत अनियमितता करणाऱ्या १९ धान खरेदी केंद्रावर जिल्हा प्रशासन व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ही कारवाई करीत या संस्थांचे धान खरेदी करण्याचे अधिकार गोठविले आहे.
हे ही वाचा : सौन्दड: धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा गोंधळ !
आज ११२ शेतकऱ्यांचे ३७९४.८० क्विन्टल धान खरेदी करण्यात आला आहे.
त्या मुळे सौन्दड येथील दी. सहकारी भात गिरणी मर्या. येथील गोडाऊन मध्ये जमा अश्लेले धान्य खरेदी करण्याचे अधिकार हे गिरोला/हेटी येथे अश्लेल्या एका संस्थेकडे देण्यात आले होते. मात्र काही कारनास्ठव शेतकऱ्यांनी सदर संस्थेकडे धान्य नेण्यास नकार दिला होता, शेतकऱ्यांची मागणी होती की सौन्दड येथेच धान्य मोजावे त्यावर आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी पाठपुरावा केला आणि आज २९ रोजी सौन्दड येथील धान्य खरेदी केंद्रावर मोजणीला सुरवात झाली आहे. मात्र हे धान्य खरेदी करण्याचे अधिकार तालुक्यातील मुरपार ( राम ) आणि पांढरी या दोन खरेदी केंद्रांना देण्यात आले आहे. त्यांनी आज रोजी ११२ शेतकऱ्यांचे ३७९४.८० क्विन्टल धान खरेदी केली आहे.
१०० % टक्के शेतकऱ्यांचे सर्व धान मोजणी केली जाईल.
केंद्र धारकांनी सांगितले की आपल्याला तब्बल १८००० क्विन्टल धान खरेदीचे उदिस्ट मिळाले आहेत. त्या मुळे सौन्दड परिसरातील उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी आपले धान विक्री करिता ३१ ऑगस्ट पर्यंत सदर केंद्रावर आणावे. ३२५ शेतकऱ्यांचे ९२०० क्विन्टल गोडाऊन मध्ये अश्लेले धान्य मोजणी होणार आहे. तसेच अन्य शेतकऱ्यांचे ८०० क्विन्टल धान्य खरेदीसाठी येणे अपेक्षित आहे. तर १०० % टक्के शेतकऱ्यांचे सर्व धान मोजणी केली जाईल असीग्वाही दरम्यान दिली आहे.
संस्थेने शेतकऱ्यांचा बारदाना परत करावा.
यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे अर्जुनी मोर. यांनी भेट दिली. तर जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेई, सहय्यक जिल्हा मार्केटिंग अधिकारी बिष्णोई, तहसीलदार किशोर बागडे, ठाणेदार सचिन वांगडे, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष गंगाधर परसुरामकर, तलाठी उमराव वाघधरे, रमेश चुर्हे संस्था अध्यक्ष, अविनास काशीवार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, सुखदेव कोरे, प्रभूदयाल लोहिया, राजा भाऊ गुब्रेले, रमेश (मुन्ना) अग्रवाल सह शेतकरी वर्ग मोठया संखेत उपस्थित होते. यावेळी संस्थेने शेतकऱ्यांचा बारदाना परत करावा असी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.