वाघाच्या हल्ल्यात मृतकाच्या कुटुंबाला 1 लाखाची तात्काळ मदत.



गोंदिया, गोरेगाव, दिनांक 22 जुलै 2021 – पिंडकेपार जंगल परिसरात भडंगा येथील शेतकरी पूणा मोहन मेश्राम यांची 21 जुलै रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाले होते, त्यामुळे पूणा मोहन मेश्राम यांचा परिवारावर दुःखाचे डोंगर निर्माण झाले आहे.

त्यांच्या परिवारामध्ये पत्नी व पती असे दोघेच राहत होते , आणि कुटुंबातील कमावणारा व्यक्ती गमावल्याने सदर परिवारावर मोठे संकट ओढवले असल्याने त्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून वनविभागातर्फे 1 लाखाची मदत चेक स्वरूपात म्हणून आज 22 रोजी करण्यात आली आहे.

यावेळी वनविभागातील कर्मचारी प्रवीण साठवणे, विक्की लांजेवार, तसेच सरपंच शारदा उके, उपसरपंच उमाकांत मोटघरे, ग्रामपंचायत सदस्य खुटमोडे, गोरेगाव पं. स. सभापती विश्वजित डोंगरे, गावातील प्रतिष्ठित नागरिक नरेन्द्र पटले, हेमंत मस्करे , संपता बाई मंडिये व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


 

Leave a Comment